करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्याच्या दिशेने जात असताना खासगी बसचा अपघात ; जखमी रुग्णालयात दाखल

करमाळा समाचार

जेऊर करमाळा रोडवर करमाळा जवळील बागल पंपाजवळ एका खासगी बसचा अपघात झाला असून काही लोक किरकोळ जखमी झाली आहेत. जखमींना उपचाराकरिता शासकीय रुग्णालय करमाळा येथे पाठवले असून वाहतूक सुरळीत चालू आहे. सदरचा अपघात पहाटे पाच च्या सुमारास घडला यावेळी घटनास्थळी मनिष पवार पोलिस पथकासह पोहचले व अपघातग्रस्त लोकांना दवाखान्याकडे पाठवण्यात आले.

कर्नाटक हून राजस्थान कडे निघालेली खासगी बस करमाळा शहरालगत असलेल्या बागल पेट्रोल पंपापर्यंत आल्यानंतर पहाटे पाचच्या सुमारास पाठीमागून एका कंटेनरला जाऊन धडकली. यावेळी झालेल्या अपघातात पाच ते सहा लोक किरकोळ जखमी झाले आहेत अशी प्राथमिक माहीती आहे. तर बस मध्ये इतर सुखरूप आहेत. परिसरातील लोकांनी करमाळा पोलीस ठाणे यांना संपर्क केला. यावेळी तात्काळ पोलीस त्या ठिकाणी पोहोचले व रुग्णवाहिक यांच्या साह्याने जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE