देशमुख खून प्रकरण – उद्या करमाळा बंद ; विविध मागण्यांचे दिले निवेदन – एस टी ला असेल सवलत
करमाळा समाचार
मस्साजोगचे सरपंच स्व. संतोष देशमुख यांची अमानुषपणे झालेल्या हत्येच्या निषेधार्थ व धनंजय मुंडेला मुख्य सुत्रधार करुन गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी करमाळा शहर व तालुका बंद घोषीत करण्यात आला आहे. यावेळी सकल मराठा समाजासह इतर समाजातील कार्यकर्त्यांकडुन तहसिलदार व पोलिस ठाणे येथे निवेदन देण्यात आले आहे. यावेळी धनंजय मुंडे यांना सहआरोपीसह इतर मागण्या करण्यात आल्या आहेत. तर परिक्षांमुळे एस टी चालु ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

मस्साजोग येथील घडलेली घटना ही मानवतेला काळीमा फासणारी आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अशी प्रवृत्ती राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी मुळासकट संपवावी असे आवाहन करण्यात येत आहे. स्व संतोष देशमुख यांना मारत असताना आरोपी ज्या प्रकारे मारताना आनंद घेत होते ही खरोखर किती कुरतेची बाब आहे याचा निषेध म्हणून करमाळा बंद ठेवला आहे तर विविध मागण्या केल्या आहेत.

त्यामध्ये मस्साजोग घटनेचा मास्टरमाईंड वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांना मुख्य सुत्रधार आरोपी करण्यात यावे, स्व. संतोष देशमुख यांची हत्या करणाऱ्या आरोपींना भर चौकात फाशीची शिक्षा मिळावी, सदरचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, आरोपींचे व्हि.डी.ओ. फोटो कोर्टात आरोप पत्रात दाखल केलेले आहेत हाच ठोस पुरावा आहे, स्व. संतोष देशमुख यांची ज्याप्रकारे आमानुषपणे कपडे काढुन मारहाण केली, तसेच निच प्रवृत्तीच्या आरोपींनी स्व. संतोष देशमुख यांना मारहाण होत असतानाचे व्हि. डी.ओ. कॉल करुन व व्हि. डी.ओ. काढून कोणाकोणाला पाठविले त्या सर्वांना आरोपी करावे, स्व. संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना स्व. संतोष देशमुख यांनी पाणी मागितल्यावर त्यांच्या तोंडात लघुशंका करण्यात आली. ज्या आरोपींनी हे कृत्य केले त्या आरोपीचे गुप्तांग काढण्यात यावे यासर्व मागण्या महाराष्ट्र शासनाने कोणासही पाठीशी न घालता पुर्ण कराव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.