करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

दुर्घटना – टेंभुर्णी रस्त्यावर कविटगाव येथे भीषण अपघात ; एक ठार

करमाळा समाचार

अहमदनगर टेंभुर्णी मार्गावर कविटगाव येथे सकाळी एक भीषण अपघात झाला असून या ठिकाणी एक महिला ठार तर दोन जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. सदरच्या अपघातात जेऊर येथील वाघमोडे कुटुंबीय जात असताना रस्त्यात उभा असलेल्या माल ट्रक सोबत अपघात झाला असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. मयत महिला पोलिस कर्मचाऱ्याची बहिण आहे तर भाऊ व आई जखमी आहेत.

पोलीस कर्मचारी कुटुंबीय कंदरच्या दिशेने जात असताना सकाळी सहाच्या सुमारास रस्त्यात उभा असलेल्या आयशरला धडक झाल्याने त्यामध्ये शारदा वाघमोडे या मयत झाल्या आहेत तर दोन जण जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी बाहेरील रुग्णालयात पाठवले आहे. सदरच्या प्रकरणात करमाळा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आले असून पुढील कार्यवाही केली जात आहे.

politics

 

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE