करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

आपल्या चौकात आपली औकात तपासून पुढचा लढा ; सध्याच्या राजकीय घडामोडींवर जानकरांची सडेतोड उत्तरे

करमाळा समाचार

राजकारणात कोणीच कायमचा शत्रू नसतो त्याप्रमाणे मी माझा पक्ष वाढवण्यासाठी कोणत्याही पक्षासोबत जाण्याची शक्यता नाकारत नाही. सध्यातरी आपण कोणावरही नाराज नसुन आपण लोकसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढणार असल्याचे रासपाचे प्रमुख माजी मंत्री महादेव जानकर यांनी स्पष्ट केले. तर खा. पवारांच्या भेटीबाबत खुलासा करीत ते जेष्ठ नेते आहेत धनगर समाजाबद्दल त्यांनी काहीच चुकीचे काय केले नाही त्यांना खालच्या थराला जाऊन बोलणे चुकीचे असल्याचेही सांगितले.

माजी मंत्री जानकर हे पुढील कार्यक्रमाच्या निमित्ताने जात असताना करमाळा येथे कार्यकर्ता संवाद साधण्यासाठी चालले होते. यावेळी ते बोलत होते. इतर ठिकाणी काम चांगले असले तरी करमाळ्यात मात्र पक्षाच्या कामावर खुश नसल्याने पदाधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. तर स्वतंत्र लढण्या मागचे कारण सांगताना माझी ताकद नसल्यामुळे मी ताकद वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. आपल्या चौकात आपली औकात नसताना चर्चा करण्यात काय अर्थ आहे. आज आमच्याकडे निवडणूक जिंकलेले पदाधिकारी कमी आहेत मग आम्ही दुसऱ्याला नावे ठेवण्यात काय अर्थ आहे. पहिले आम्ही औकात वाढवणार मग दावा करणार.

आमच्या पक्षाला राष्ट्रीय दर्जा आहे. सगळ्या राज्यात काही ना काही योगदान आहे. महाराष्ट्रातील इतर पक्षांच्या तुलनेत आमचे चांगले काम आहे. गुजरात मध्येही आमचे २८ नगरसेवक आहेत. त्यामुळे आम्ही आमच्या ताकदीवर लढत आहोत. त्याशिवाय पवारांच्या भेटीवरुन लोकसभेच्या चर्चा सुरु झाल्यापण ती एक साधी भेट होती. तो विषय पुढे वाढवणे चुकीचे आहे. आपले त्यांच्यासोबत भांडणही नाही. आ. पडळकर हे पवाराना टारगेट करतात यावरही त्यांनी स्पष्ट केले की, पवारांनी धनगर समाजाचे काय वाईट केले नाही. त्यांना अधिक खालच्या भाषेत बोलणे चुकीचे आहे. तर सारखे पवारांना टारगेट केले जातय यावरुनही आंब्याच्या झाडाला दगडे मारले जातात असे वक्तव्य करुन पवारांची पाठराखण केली.

दोन्ही आघाड्या चोर आहेत ; पण सत्ता आली तर सोबत जाऊ ..
भाजपा आणि महाविकास आघाडी दोन्ही चोर आहेत. कारण चांगल्या कामाला नावे ठेवणे किंवा थांबवणे चुकीचे आहे. दोन्ही पक्ष तसेच करतात कायम चांगल्या कामांना थांबतात. येणाऱ्या काळात आपणही या चोर म्हणालेल्या पक्षा सोबत जाणार का ? या प्रश्नावर मात्र त्यांनी थेट सत्ता मिळत असेल आणि आम्ही काही चांगले करत असु तर आम्हाला पाठिंबा घ्यायला हरकत नसल्याचे म्हणले आहे. तर मनसे प्रमुख राज ठाकरे प्रमाणे मला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री करा महाराष्ट्र सुतासारखा सरळ करेल असे म्हणत वेळ आली तर येणाऱ्या काळात राज ठाकरेंसोबतही युती करु असे सांगायलाही विसरले नाहीत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE