करमाळाक्राईमसोलापूर जिल्हासोलापूर शहर

पोलिस तपासात त्रूटी विवाहीतेच्या आईची न्यायालयात धाव ; नवरा सासुवर खुनाचा गुन्हा दाखल

करमाळा समाचार

जवळा तालुका जामखेड येथील विवाहित महिलेचा मृतदेह करमाळा तालुक्यातील पोपळज येथील रेल्वे स्टेशनवर आढळून आला होता. त्या घटनेत आता नवीन वळण मिळाले असून सदर प्रकरणात पती व सासू यांच्यावर करमाळा पोलीस ठाण्यात खून केल्या असल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचे प्रकरण न्यायालयातून दाखल झाले आहे. या प्रकरणात करमाळा पोलिसांनी कोणताही तपास न करता पुढील कारवाही केल्याचे नमूद करण्यात आले आहे.

संजय नरहरी बिचितकर व सुजनाबाई नरहरी बिचतकर असे दोन संशयित आरोपींची नावे आहेत. दोघेही रा. जवळा, ता. जामखेड, जिल्हा अहमदनगर. याप्रकरणी मुलीचे आई गीताबाई संजय सरडे वय 72 जवळा ता. जामखेड यांनी तक्रार दिली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, 26 मे 2023 रोजी गिताबाई यांची मुलगी रुक्मिणी हिचा मृतदेह सायंकाळी सहाच्या सुमारास पोफळज तालुका करमाळा येथे रेल्वे रुळालगत मृत अवस्थेत आढळून आला होता. तिचा मुतदेह त्या ठिकाणी कसा आढळून आला. ती तिथपर्यंत कशी पोहोचली ? याबाबत कसलीही चौकशी झाली नाही. शिवाय तिच्याकडे मोबाईल नव्हता तरीही तिच्या जवळ मुलीचा मोबाईल नंबर असलेली चिट्टी लिहून ठेवली होती.

ads

सदर चिट्ठी कोणी लिहिली रुक्मिणीला लिहिता वाचता येत नव्हते. शिवाय घरापासून ती पोफळज पर्यंत कशी पोहोचली ? याबाबत कसलेही पुरावे नाहीत. तरीही या प्रकरणाची सखोल चौकशी न करता पुढील कारवाई करण्यात आली होती. त्यामुळे फिर्यादी हे न्यायालयात गेले. त्यावेळी न्यायालयाने सदर प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE