E-Paperसोलापूर जिल्हा

आयटीआय प्रवेश प्रक्रिय सुरु २५ ट्रेड साठी ९२४ जागा

सोलापूर – वृत्तसेवा

औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील प्रवेशप्रक्रिया १२ जून,२०२३ पासून सुरू करण्यात आली आहे. सोलापूर विभागातील २५ शासकीय व ९२४ खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थामध्ये ती राबविली जात असून, दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण इच्छुक विद्यार्थ्यांनी admission.dvet.gov.in या संकेतस्थळावर जाऊन ११ जुलै, २०२३ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य ए. डी. जाधवर यांनी केले आहे.

उमेदवाराने आनलाइन अर्ज नोंदवून झाल्यावर जवळच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये जाऊन आपला प्रवेश निश्चित करावा. त्यानंतर पर्याय निवडावेत. दहावी उत्तीर्ण व अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आयटीआयमधून व्यावसायिक शिक्षण पूर्ण करून त्वरित रोजगार, स्वयंरोजगार अथवा उच्च शिक्षणाच्या संधीचा लाभ होण्यासाठी आयटीआयमध्ये प्रवेश घेण्याचे आवाहन प्राचार्य जाधव यानी केले आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया अशी

अकरा जुलैपर्यंत करा ऑनलाईन अर्ज

डिप्लोमाच्या दुसऱ्या वर्षात थेट प्रवेश
आयटीआय उत्तीर्ण होणाऱ्या सर्व प्रशिक्षणार्थ्यांना शासनातर्फे शिकाऊ उमेदवार योजने अंतर्गत रोजगार उपलब्ध करून दिला जातो. अप्रेंटिस काळात रोजगार उपलब्ध करून देण्याच्या योजनेमुळे आयटीआय प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व उमेदवारांना भविष्यात रोजगार मिळविणे अथवा स्वयंरोजगार करणे सोयीचे होते. तसेच दोन वर्षांचा आयटीआय प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांना थेट डिप्लोमा इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेता येते. अथवा ठराविक विषयाची परिक्षा देऊन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड पुणे यांच्याकडून एच.एस.सी प्रमाणपत्र प्राप्त करून घेता येते.

ऑनलाइन अर्जात प्राथमिक माहिती भरल्यानंतर करण्यात आलेले प्रवेश खात्यात प्रवेश करून त्यात ॲडमिशन ॲक्टिव्हीज या मथळ्याखालील

सोलापुरातील विजापूर रोड येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये यावर्षी विविध २५ ट्रेडमध्ये प्रवेशासाठी एकूण ९२४ जागा उपलब्ध आहेत. प्रवेशासाठी शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण अथवा अनुत्तीर्ण विद्यार्थी पात्र आहेत. विद्यार्थ्यांना खात्रीचा रोजगार उपलब्ध होण्यासाठी आय.टी.आय. मध्ये प्रवेश घ्यावा. ए. डी. जाधवर, प्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, सोलापूर

ट्रेड्स व जागा : वेल्डर ४०, फिटर ६०, ऑपरेटर १६, कातारी ८०, यंत्रकारागीर ६०, मेकॅनिक ४८, पत्रेकारागीर ४०, सुतार काम २४, फाँड्रीमन ४८, मेकॅनिक डिझेल ४८, मेकॅनिक मोटार २४, वायरमन २०, प्लंबर २४ आरेखक २०, वीजतंत्री ८०, पेंटर २०, ट्रॅक्टर मेकॅनिक ४०, गवंडी २४ असे ९२४ जागा आहेत.

विद्यार्थ्यांना खात्रीच्या रोजगारासाठी उपयुक्त
संकेतस्थळावर देण्यात आलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल करता येईल. उमेदवाराचे प्रवेश खाते आणि नोंदणी क्रमांक हेच युजर आयडी म्हणून तयार करण्यात येईल. https://admission.dv et.gov.in/ आयटीआय ॲडमिशन पोर्टल आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE