कुंकु गल्लीत बंद घरात चोरी केलेल्या आरोपींचा शोध लागला ; चौघांना अटक
करमाळा समाचार
शहरातील कुंकू गल्ली येथील सोमनाथ बरीदे हे किराणा सामान आणायला गेल्यावर दि. २९ रोजी १२च्या दरम्यान घरात प्रवेश करून आतील लोखंडी कपाटातील 1) 40,000/- रू. किंमतीचे सोन्याची अंदाजे 1 तोळा वजनाचे चोख बिलवरी जु.वा. किं. अं. 2) 20,000/रू. किं. च्या सोन्याच्या अंदाजे अर्धा तोळा वजनाच्या दोन अंगठया जु.वा. किं. अं. 3) 60,000/- रू. किं. चे सोन्याचे चेन लॉकेट अंदाजे दीड तोळा वजनाचे जु.वा. किं. अं. 4) 20,000/-रू. किंमतीचे सोन्याची अंदाजे | अर्धा तोळा वजनाची चोख बिलवरी जु.वा. किं. अं. 1,40,000/- रू. असा मुद्देमाल चोरणाऱ्या चौघांना अटक करण्यात आली आहे.

सदर आरोपींचा शोध घेत असताना 1) करण उर्फ बंब्या अंबादास वय 24 करमाळा 2) सुशील उर्फ बबलू नामदेव गायकवाड वय 24 राहणार मुथानगर करमाळा 3) आफताब मेहबूब शेख वय 19 राहणार पांडे करमाळा 4) गणेश पांडुरंग शिंदे वय 18 राहणार कामोणे तालुका करमाळा यांच्याकडे तपास केला असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांच्याकडून गुन्ह्यातील गेलामाल 140000 रुपये किमतीचे सोने त्यात एक सोन्याची चैन व अंगठ्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जोतीराम गुंजवटे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस हवालदार अजित उबाळे, भाऊराव शेळके, पोलीस नाईक चंद्रकांत ढवळे, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ जगताप, गणेश शिंदे, तोफिक काझी कारवाई केलेली आहे.