करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळ्यात लाचलुचपत विभागाची कारवाई ?

करमाळा समाचार


शहरात प्रशासकीय इमारतींच्या आवारात काल एकच हडकंप उडाला होता. कोणावर तरी लाचलुचपत विभागाच्या वतीने कारवाई झाल्याची माहिती येऊन धडकली व सगळ्याच कार्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये आपापसात चर्चा सुरू झाली. बराच वेळ सदरची चर्चा सुरू असतानाही नेमकी कोणावर कारवाई झाली हेच कळेना. अखेर सदरचा विषय तिथेच थांबला. पण यातून नेमकी कारवाई झाली का ? किंवा कारवाईसाठी लोक आले होते सापळा रचला व माघारी फिरले असं काय घडले आहे का ? असेही अनेक प्रश्न यातून अनुत्तरीत राहिले आहेत.

मागील महिन्यात करमाळा येथे एका मंडळाधिकारी महिलेवर लाचलुचपत विभागाच्या वतीने कारवाई करण्यात आली होती. तेव्हापासून करमाळ्यात लाच लुचपत विभागाच्या वतीने कसलीही कारवाई दिसून आली नाही. पण काल अचानक काही कर्मचाऱ्यांचे फोन वाजले आणि त्यांना माहिती मिळाली की करमाळ्यात कुठेतरी कोणावर तरी लाच लुचपत विभागाची कारवाई झाली आहे. तात्काळ त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना फोन फिरवले व माहिती घेण्याचा प्रयत्न केला.

पहिल्या माणसाने सहज फोन लावला असला तरी तो फोन कर्मचाऱ्यांनी एकमेकांना फिरवल्यानंतर त्यात तथ्य वाटू लागले. त्यामुळे नेमका पहिला फोन अफवाचा होता का ? हे कोणालाच कळले नसताना यावर चर्चा गरम झाली. त्यानंतर परिसरात धावाधाव व चर्चांना ऊत आला. या संदर्भात लाचलुचपत विभागातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता अशी कोणतीही कारवाई झाली नसल्याची माहिती मिळाली. पण करमाळ्यातील त्या एका फोनने सर्वत्र कारवाईची चर्चा रंगली. नेमकं कारवाई कोणावर होणार होती आणि थांबली कशी ? शिवाय खरंच कारवाई होणार होती का अफवा होती अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधावी लागतील.

politics
DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE