करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

संवेदनशील गावात कॅमेरा ऑन तर एका मशीन मध्ये किरकोळ बिघाड ; मतदान सुरुळीत चालु

करमाळा समाचार

तालुक्यातील १५ ग्रामपंचायती पैकी जेऊर, केम, कोर्टी, कंदर, वीट या ठिकाणी संवेदनशील ग्रामपंचायत म्हणून पाहिले जात आहे, तर त्या ठिकाणी अधिकचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली आहे सर्वत्र शांततेत मतदान सुरू असून केम येथे किरकोळ अडचण मशीन मध्ये आली होती ती दूर करण्यात आली आहे. तर संवेदनशील गावात जिथे गरज असेल तिथे कॅमेरा ऑन झाला आहे.

तालुक्यातील १६ ग्रामपंचायत साठी मतदान सुरु झाले आहे. यात एक ग्रामपंचायत अविरोध झाल्यामुळे १५ ग्रामपंचायतीसाठी एकूण ५२८ कर्मचारी काम पाहत आहेत. सर्व प्रक्रियेत निरिक्षक म्हणुन प्रियंका आंबेकर व सह निरिक्षक म्हणुन तहसिलदार विजयकुमार जाधव काम पाहत आहेत.

यावेळी करमाळा तालुक्यातील जेऊर, रामवाडी, कावळवाडी, भगतवाडी, राजुरी, चिखलठाण, गौडरे, कंदर, कोर्टी, केम, रावगाव, घोटी, वीट, केतुर, निंभोरे या गावांमध्ये सदरचे निवडणूक होणार आहे. तर यापूर्वी उंदरगाव ग्रामपंचायत मध्ये विरोधी गटाकडून अर्ज न आल्याने सदरची ग्रामपंचायत अविरोध घोषित करण्यात आले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE