करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

लाचलुचपत विभागाची कारवाई ; मंडळ अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

करमाळा समाचार

लाचलुचपत विभागाच्या वतीने करमाळा तालुक्यात आज एक कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये उमरडचे मंडळ अधिकारी श्रीमती काझी यांना लाचलुचपत विभागाने ताब्यात घेतले असून त्यांच्या विरोधात पुढील कारवाई सुरू आहे.

करमाळा तहसील अंतर्गत येत असलेल्या उमरड येथील मंडळ अधिकारी यांनी फिर्यादीला काही नोंदी बाबत पैशाची मागणी केली होती. सदर फिर्यादीने संबंधित प्रकरण लाचलुचपत विभागापर्यंत पोहोचवले. यावेळी संपूर्ण पथकाने आज सापळा रचला व दुपारी तीनच्या दरम्यान या मंडळ अधिकारी यांना ताब्यात घेतले आहे.

त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून चौकशी केली जात आहे. तर पुढील कारवाई थोड्याच वेळात होईल अशी माहिती मिळत आहे. संबंधित व्यक्तीकडून 25 हजाराची मागणी केली होती. सदर फिर्यादीचे नाव हे गोपनीय ठेवण्यात आले आहे. ही कारवाई सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने करण्यात आली आहे

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE