करमाळासोलापूर जिल्हा

पंचायत समीती सभापती निवडीत चमत्कार घडवून दाखऊ – विरोधी गटाचा दावा

करमाळा समाचार 

पंचायत समीती करमाळा सभापती पदाच्या निवडी दिवशी प्रशासनाकडून अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच अतुल पाटील समर्थकांनी जल्लोष साजरा केला. पण ऐनवेळी प्रशासनाने तक्रारीची दखल घेऊन निवड पुढे ढकलली.

दरम्यान एकही अर्ज न आल्याने वेळ संपल्यानंतर अर्ज भरण्याची वेळ संपल्यानंतर आपण विजयी झालो त्याला सर्व सहकारी मित्रांची साथ लाभल्याचे अतुल पाटील यांनी सांगितले होते. त्यामध्ये विरोधी गटाचे ही सदस्यांचा सहभाग असल्याचे बोलून दाखवत त्यांनी इतर सर्व नऊ सदस्य माझ्या सोबत असल्याचे सांगितले होते.

पण हा गैरसमज त्यांचा थोड्याच वेळात दूर झाला दहापैकी एक सदस्य ॲड राहुल सावंत यांनी वेगळी भूमिका घेत विरोध दर्शवला व येणाऱ्या नऊ जुलै रोजी होत असलेल्या निवड मध्ये आमदार संजय मामा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण चमत्कार घडवून दाखवू असे एक प्रकारचे आव्हानच दिले आहे. तर यासंबंधी निवडीच्या एक दिवस पूर्वीच आपण प्रशासनाकडे अर्ज दिल्याचेही सावंत यांनी सांगितले.

त्यामुळे आता नऊ जुलै या तारखेकडे पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. पण सध्या अतुल पाटील यांनी दावा केल्याप्रमाणे इतर सदस्य सोबत असतील तर सावंत यांनी दिलेले आव्हान कुठपर्यंत तग धरू शकेल हे सांगणे आत्ता घाईचे ठरेल.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE