हातगाडयावरील कार्यवाही थांबविण्यात यावी – सुनिल सावंत
करमाळा प्रतिनिधी सुनिल भोसले
करमाळा शहरातील हातगाड्यावरील होत असलेली कारवाई थांबवावी या मागणीचे निवेदन काॅग्रेस पक्षाच्या वतीने तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले पुढे निवेदनात म्हटले आहे.

करमाळा शहरातील गोरगरीब हातगाडयावर करमाळा नगरपरिषद कार्यवाही करत आहे ती कार्यवाही थांबविण्यात यावी असे सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस सुनील बापु सावंत यांनी निवेदनाद्वारे तहसीलदार समीर माने यांना कळविण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे करमाळा शहरातील गोरगरीब हातगाडेवाले शासनाच्या नियमानुसार सोशल डिसटेंशन ठेवून मास्क लावुन पार्सल विक्री करत आहे परंतु आज दुपारी करमाळा नगरपालिकेने हातगाडयावर कार्यवाही केली आहे विशेषतः दररोज हातगाडयावाल्याकडून फी वसुल करत आहे.

जर हातगाडे बंद झाल्यास त्यांच्या वर उपासमारीची वेळ येणार आहे त्यामुळे रोजीरोटीचा प्रश्न निर्माण होणार आहे त्यामुळे शासनाच्या नियमांचे शंभर टक्के पालन करून सोशल डिसटेंशन ठेवून हातगाडे चालू आहेत म्हणून हातगाडयावरील कार्यवाही थांबविण्यात यावी अशी मागणी सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस सुनील बापु सावंत यांनी केली आहे यावेळी फारूक जमादार, दादासाहेब इंदलकर, अस्लम नालबंद उपस्थित होते.