करमाळासोलापूर जिल्हा

करमाळ्यात तीन नवीन डेडिकेटेड कोविड सेंटर सुरू होणार डॉ. प्रदीप ढेले ; आणखी पन्नास ऑक्सिजन बेडची क्षमता वाढविणार

करमाळा समाचार 


वाढत्या कोरणा रुग्णसंख्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या उपचारासाठी बेडची कमतरता भासू नये म्हणून शहरातील विविध हॉस्पिटल मध्ये आणखी पन्नास बेडची व्यवस्था केली जाणार आहे अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रदीप ढेले यांनी दिली.

सुरुवातीला प्रदीप ढेले यांनी टेंभुर्णी येथील ऑक्सिजन जनरेशन प्लॅंटला भेट देऊन ऑक्सिजनची कमतरता होणार नाही याबाबत खात्री केली. ग्रामीण रुग्णालय जेऊर येथे भेट देऊन कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याची पाहणी केली. तसेच करमाळा शहरात पवार हॉस्पिटल, शहा हॉस्पिटल, शेलार हॉस्पिटल येथे भेट देऊन तेथील सुविधांची पाहणी केली. उपजिल्हा रुग्णालय येथील कोविड १९ लसीकरण सत्र, महात्मा फुले जन आरोग्य योजना व इतर कामाचा आढावा घेतला.

त्यानंतर ढेले यांनी तहसील कार्यालय करमाळा येथे तहसीलदार समीर माने यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. बैठकीस उपजिल्हा रुग्णालय करमाळा वैद्यकीय अधीक्षक डॉ. अमोल डुकरे व इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत खाजगी दवाखान्यात ऑक्सीजन बेड संख्या वाढवणे व कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याबाबत चर्चा झाली.
डॉ. पवार हॉस्पिटल कमलाई हेल्थ सेंटर २५ बेड, डॉ. संदेश शहा हेल्थ सेंटर १० बेड व डॉ. शेलार कोविड सेंटर १० बेड सेंटर मान्यते स्पर्धेसाठी प्रस्ताव पाठवण्यात आले आहे. उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे सात बेड कार्यान्वित केले आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE