मकाईचे तत्कालीन चेअरमन दिग्विजय बागल यांच्यासह १७ संचालकांवर कारवाईचे आदेश !
करमाळा समाचार –
करमाळा येथील न्यायालयाने मकाई सहकारी साखर कारखान्याची तत्कालीन चेअरमन दिग्विजय बागल यांच्यासह 17 जणांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहे. त्यांच्या विरोधात आळजापुर येथील समाधान शिवदास रणसिंग यांनी न्यायालयात तक्रार दिली होती. त्यानुसार सदरची आदेश देण्यात आले आहेत यावेळी त्यांच्य वतीने ॲड. अनिल कांबळे यांनी काम पाहिले. अद्याप पर्यत सदरची आदेशाची प्रत करमाळा पोलिसात आली नाही. प्रत मिळताच पुढील कार्यवाही होणे शक्य आहे.

सन 2022 – 23 या गळीत हंगामामध्ये श्री मकाई सहकारी साखर कारखाना व सहकारी कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची ऊस बिले आज पावतो देण्यात आलेली नाहीत. तसेच या संदर्भात वेळोवेळी कारखाना व्यवस्थापन पोलीस निरीक्षक व जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यासह इतर कार्यालयांकडे तक्रारी निवेदन, आंदोलने, उपोषणे करूनही रक्कम मिळाली नसल्याची तक्रार अर्जदाराची होती. सदर बाब न्यायालयात गेल्यानंतर त्या ठिकाणी दखल घेण्यात आली व तत्कालीन अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह तत्कालीन सदस्यांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

मकाई सहकारी साखर कारखान्याच्या 17 – 18 ते 22 – 23 या सार्वत्रिक पंचवार्षिक निवडून आलेले संचालक यांचे संबंधित कारखान्यावर कामकाज करीत होते. त्यामुळे त्यांना जबाबदार धरण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती त्यामुळे यात सर्वांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.