आदिनाथ नंतर करमाळा अर्बनच्या निवडणुका जाहीर ; आज पासुन अर्ज विक्रीला सुरुवात
करमाळा समाचार
तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्यानंतर आता सहकारी संस्था संचालक मंडळांच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये मागील काळापासून अडचणीत असलेल्या दि करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड करमाळा यासह इतर सहकारी संस्थांचा समावेश आहे. 4 एप्रिल पासून सदरची नामनिर्देशन पत्राची विक्री तर 11 मे रोजी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

करमाळा शहरातील दि करमाळा अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड करमाळा यासह तालुक्यातील सरपडोह विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित सरपडोह व कविटगाव विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित कविटगाव या सहकारी संस्थांची निवडणूक जाहीर झाली आहे.

04 एप्रिल ते 11 एप्रिल सकाळी 11 ते 3 या वेळेत नामनिर्देशक पत्र विक्री केली जाणार आहे. तर 15 एप्रिल सकाळी 11 वाजता नामनिर्देशन पत्राची छाननी केली जाणार आहे. 16 एप्रिल ते 30 एप्रिल नामनिर्देशन पत्र माघारी घेण्याची वेळ सकाळी 11 ते 3 या कालावधीत आहे. तर आवश्यक असल्यास मतदानाची तारीखही जाहीर करण्यात आली आहे. करमाळा अर्बन 11 मे सरपडोह 12 मे व कविटगाव 10 मे असे नियोजन जाहीर करण्यात आले आहे.