करमाळासोलापूर जिल्हा

धक्कादायक ; उपजिल्हा रुग्णालयात कोरोना वार्डात कोरोना रुग्णाची आत्महत्या

करमाळा समाचार 

कोरोना आजाराला कंटाळुन निर्मला अनिल गायकवाड (वय ५०) वर्षे रा. जेऊर ता.करमाळा यांनी उपजिल्हा रुग्णालय, करमाळा येथे साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि १९ रोजी पहाटे साडे तीनच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात अकस्मात मयत म्हणुन दाखल करण्यात आले आहे.

तर सदरच्या महिलेला कोविड मध्ये गंभीर असल्याने तीला दुसऱीकडे पाठवण्याबाबत सांगण्यात आले होते नेण्याआधीच तीने आत्महत्या केल्याने इतर रुग्णात भितीचे वातावरणात निर्माण झाले आहे.

मागील सात दिवसापासून निर्मला गायकवाड या उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी कोविड १९ बाबत उपचार घेत होत्या. त्यांचा एच आर सीटी स्कोर हा गंभीर असा २२ होता. त्यामुळे करमाळा उपजिल्हा रुग्णालयाने सदर रुग्णाला सोलापूर येथे घेऊन जाण्यास सांगितले होते. धाप लागण्याच्या त्रासाने दाखल केल्यानंतर तब्बेतील सुधारणा होत नसताना झालेल्या असाह्य वेदानामुळे निर्मला यांनी पहाटे साडे तीन वाजण्याच्या पुर्वी उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथील कोव्हीड वाँर्डमध्ये खिडकीच्या लोखंडी गजाला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसुन आले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE