शिवसेना पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिल्यानंतर दिग्विजय बागल मैदानात ; प्रचाराला सुरुवात
करमाळा समाचार

करमाळा विधानसभा मतदारसंघातील उमेदवारी ही शिवसेनेकडे असल्याने तडजोड करीत शिवसेने कडून निवडणूक लढविली आली. दिग्विजय बागल अखेर स्वगृही परतल्याचे दिसून आले. करमाळा नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत दिग्विजय बागल यांनी गळ्यात भाजपाचा पंचा घेऊन घरोघरी जाऊन भाजपा उमेदवारांसाठी प्रचार करण्यास सुरुवात केल्याची चित्र दिसून येत आहे. नुकतेच पालकमंत्री यांनी बागल यांच्या प्रवेशाची गरज काय ते आमचेच असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे आता उघडपणे बागल हे मैदानात उतरल्याची दिसत आहे.

सध्या करमाळा तालुक्यात शिवसेना विरुद्ध भाजपा असा सामना रंगतदार स्थितीत जाऊन पोहोचला आहे. दोन्हीही पक्षाचे नेते एकमेकांना समोरासमोर आव्हान देऊ लागले आहेत. या परिस्थितीत दोन्हीही पक्ष युतीमध्ये असले तरी सदरचा सामना हा मैत्रीपूर्ण राहिलेला नसून आता प्रतिष्ठेचा झालेला आहे. नुकताच पालकमंत्र्यांनी भाजपाचा विजय मिळवण्यासाठी साम-दाम-दंड-भेद वापरला जाईल असे सांगितल्यानंतर आता शिवसेना नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांनीही प्रति आव्हान देत मैदानात उतरले आहेत.
अशा परिस्थितीत गावोगावी शिवसेनेचे काम करीत असताना संघटन उभा केलेले दिग्विजय बागल पुन्हा एकदा भाजपमध्ये सक्रिय झाल्याने नक्कीच भाजपाची ताकद या ठिकाणी वाढलेली दिसून येत आहे. यापूर्वी महिला नेत्या रश्मी बागल, विलासरावजी घुमरे,गणेश चिवटे कन्हैयालाल देवी यांनी प्रचाराची धुरा सांभाळलेली होती. तरी दिग्विजय बागल हे दिसत नसल्याने यांच्या बाबतीत चर्चांना उधाण आले होते. ते प्रचारात सक्रिय दिसत नव्हते म्हणून उलट सुलट चर्चा चांगल्या होत्या. परंतु आता कोणत्याही मोठ्या प्रवेशाशिवाय थेट मैदानात बागल उतरल्याने भाजपासाठी ही जमेची बाजू ठरू लागली आहे.


