करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

गुन्हा दाखल झाल्यानंतर शंभुराजे जगताप यांच्याकडुन पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

करमाळा समाचार

कार्यकर्त्याची मध्यस्थी करत असताना झालेल्या वादावादी नंतर जगताप गटाचे युवा नेते शंभुराजे जयवंतराव जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती शंभूराजे जगताप यांना मिळाल्यानंतर त्यांनीच पोलिसांचे विविध प्रकरणात दुर्लक्ष व मनमानी शिवाय लाचखोरीचे आरोप केले आहेत. या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेत जाहीर आव्हानच पोलिसांना दिले आहे.

करमाळा तालुक्यात करमाळा पोलीस प्रशासन तसेच जगताप गटाचे नेते शंभूराजे जगताप यांचे बऱ्याच वेळा कोणत्या ना कोणत्या कारणाने खटके उडत असल्याचे दिसून आलेले होते. पण याचे रूपांतर आता गुन्हा दाखल करण्यापर्यंत जाऊन पोहोचले आहे. यासंदर्भात जगताप यांनी काल पत्रकार परिषद घेत बरेचसे आरोप पोलीस प्रशासनावर केले. त्यामध्ये मोटरसायकलवर वाळू घेऊन जात असताना कारवाई केली गेली व पैशांची मागणी केल्याचा प्रमुख आरोप यावेळी करण्यात आला. त्या संदर्भात एक व्हिडिओही प्रसिद्धीस देण्यास आला आहे. त्यामध्ये पोलीस व शंभूराजे जगताप यांच्यात वादावादी होताना दिसत आहे.

politics

दुपारी साडेचारच्या सुमारास मोटरसायकलवर वाळू घेऊन जात असताना पोलिसांनी एका कार्यकर्त्यास पकडले व त्याच्याकडून पैशाची मागणी केली असा आरोप शंभूराजे जगताप यांनी केला. तर त्याला आपण विरोध केल्याने आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही जगताप यांनी सांगितले. मुळात पहाटे गुन्हा दाखल झाले असल्याचे स्वतः जगताप यांनी सांगितले. तरी रात्री दहा वाजेपर्यंत जगताप यांना कोणतीही कल्पना देण्यात आली नसल्याचेही जगताप यांनी सांगितले.

पोलीस ठाण्यात तक्रारी वेळेवर घेतल्या जात नाही किंवा दाखल झालेल्या तक्रारींचा तपास केला जात नाही असाही आरोप यावेळी शंभूराजे जगताप यांनी केला. फरार आरोपींना पकडण्यास पोलीस असमर्थ ठरत आहेत. तर अशा सर्व गुन्हेगारांना आपण एका दिवसात शोधुन काढु असे आव्हान यावेळी जगताप यांनी दिले आहे. तर तर पोलिसांना लाच संदर्भात विचारले असता गुन्हा दाखल होत असेल तर असे गुन्हे आपण घेण्यास तयार आहोत व या संदर्भात वरिष्ठांकडे तक्रारही करणार असल्याचे जगताप यांनी सांगितले. या संदर्भात पोलीस पुढील भूमिका कोणती घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

यासंदर्भात अधिकृतरित्या गुंह्याची माहीती अद्याप हाती आलेली नाही शिवाय वाळु प्रकणात कोणता गुन्हा झाला आहे हे स्पष्ट झालेले नाही. नेमका टॅक्टर होता की मोटारसायकल होती हा तपासाचा भाग आहे शिवाय गुंह्यातील वाहन जप्त केले आहे का जगताप यांच्यावर काय कारवाई होणार याबाबत लवकरच खुलासा होईल.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE