E-Paperकरमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

महिलांनो सावधान … फिरस्त्या कुत्र्यामुळे महिलेला घडली जन्माची अद्दल

करमाळा समाचार

महिला कायम घरात काटकसर करून रक्कम साठवतात. तसेच सोने-चांदी ही जपून ठेवतात. त्यावर चोरांची नजर पडू नये म्हणून अन्नधान्याच्या डब्यात तर कधी घरात एखाद्या खड्ड्यात रक्कम असेल किंवा सोने ठेवतात. पण एका महिलेने (गाव आणि नाव मुद्दाम लिहले नाही) कहरच केला. बारा तोळे सोने व काही रक्कम आपल्या घराबाहेर असलेल्या उकांड्यात खड्डा खांदला व त्यात लपवली आणि नको ते घडले. पण संपुर्ण प्रकरणात मोठी अद्दल मात्र तीला घडली. त्यामुळे असे प्रकार टाळले तर बरे. शक्यतो मौल्यवान वस्तू घरातील कपाटात किंवा बँकेत ठेवलेले बरे. त्यामुळे आम्हाला महिलांना आवर्जून सांगणे आहे की, बचत केलेली मौल्यवान वस्तू किंवा रक्कम जपून ठेवा सावध रहा…

नोटाबंदी झाली त्यावेळी काळा पैसा बाहेर निघाला का नाही माहित नाही. पण ज्या माऊलींनी आयुष्यभर काटकसर करून रक्कमेच्या हजारांच्या नोटा गोळा करून ठेवल्या होत्या अशी सर्व रक्कम एकदाच बाहेर काढावी लागली व बँकेत जमा करताना त्या महिलेची धावपळ उडाली असे प्रकार नोटाबंदीच्या काळात दिसून आले होते. तर आता नुकतेच दोन हजारांच्या नोटाबंदी करण्यात आल्या आहे काही दिवस त्याला मुदत असली तरी यावेळी मात्र तेवढी धांदल होणार नाही. याची सरकारने काळजी घेतलेली दिसून येत आहे. महिलांचाही बाहेर पडणे होत नाही व घरातच कुठेतरी रक्कम ठेवण्याची सवय असते.

करमाळा तालुक्यातील एका मोठ्या खेडेगावात एक महिला आपल्या पतीसोबत राहत आहे. चोरांच्या हाती सोने लागू नये यासाठी त्या महिलेने घरासमोर असलेल्या उकांड्यात तब्बल 12 तोळे सोने व काही रक्कम ठेवलेली होती. ती रक्कम रोज नित्य नियमाने त्या ठिकाणी आहे का ? येता-जाता ती पाहायची. त्या भागातील एकटीच जात असल्यामुळे कोणाचे लक्ष तिकडे कधीच गेले नाही. तर या दरम्यान केवळ एकदा तिने एका व्यक्तीस वीस हजार रुपये देण्यासाठी तो खड्डा दाखवला व त्यातील 20000 काढून त्याला दिले. पण पुन्हा तो व्यक्ती त्या खड्ड्याकडे फिरकला नाही. मात्र त्याला माहीत होते की संबंधित महिला अशा पद्धतीने पैसे ठेवते.

काही दिवसांनी तो खड्डा उकारलेला दिसला. त्यावेळी महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यातील असलेली बारा तोळे सोने व रक्कम तेथून गायब झाली होती. खड्डा उकरुन कोणीतरी त्यात ठेवलेले बोचके नेले होत ही गोष्ट लक्षात आली. त्यावेळी महिला घाबरून गेली व तिची धांदल उडाली. दरम्यान तिने ज्या पुरुषाला त्या खड्ड्याजवळ आणले होते त्याच्याजवळ चौकशी केली पण त्याने आपण तिकडे गेले नसल्याचे सांगितले. त्यावर आणखीनच टेन्शन वाढले होते. यावेळी सदर महिनेही खड्डा कुत्र्याने तरी खोदला नसेल ना यासाठी परिसरात पाहणी करण्याचे ठरवले व शोधू लागले.

त्यावेळी काही अंतरावर त्या खड्ड्यातील सोने तर मिळून आले नाही. मात्र त्यातील सोन्याची पावती मिळाली. त्यावरून परिसरातच कोणीतरी ते सोने घेतले असावे असा संशय व्यक्त होऊ लागला. त्यामुळे आजूबाजूला चौकशी केली असता सदरचे सोने कोणीतरी शोधत असलेली माहिती गावातीलच एका व्यक्तीस मिळाली. त्याने ती 12 तोळे असलेली सोने त्या महिलेस माघारी दिले. यावेळी त्यांनी घडलेला प्रकार ही सांगितला.

त्या महिलेने लपवून ठेवलेले सोने हे एका कुत्र्याने खड्ड्यात काढले व शेजारी असलेल्या शेतात नेऊन टाकले. त्या शेतमालकाला वाटले की कोणातरी चोराने सोन चोरी करून तिथे लपून किंवा आणून टाकले असावे. त्यामुळे त्याने सोने मालकाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला व थांबून राहिला. त्यावेळी त्याने घरातील माळ्यावर ठेवले होते अशी माहिती दिली. त्याने सुरक्षित ठेवल्यामुळे कमीत कमी सोने माघारी मिळाले. कदाचित त्याच्या ऐवजी दुसऱ्या कुणाच्या हाताला लागले असते तर आज तब्बल साडेसात लाख रुपयांपर्यंतचा मुद्देमाल हा त्या महिलेच्या हातातून निसटला असता. त्यामुळे महिलांनी मौल्यवान वस्तू ठेवताना काळजी घेतलेली बरी. त्यामुळे सावध व्हा..

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE