करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

प्रमुख गटांनी माघार घेतल्यानंतर कार्यकर्त्यांची माघारी साठी लगबग ; आता पर्यत सहांची माघार

करमाळा समाचार – 

श्री. आदिनाथ सहकारी साखर कारखान्यात बागल गटानंतर आता माजी जयवंतराव जगताप यांनीही माघार घेतल्याने नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. अवघे तीन दिवस शिल्लक असताना रोज नव्या नव्या घडामोडी घडत असताना आता मोठ्या गटांमध्ये पाटील व माजी आमदार संजयमामा शिंदे गट मैदानात असल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे पाटील व जगताप सोबत असतानाही केवळ जगताप गटांने माघार घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आज माघार घेण्यासाठी सुरुवात झाली आहे.

आदिनाथ सहकारी साखर कारखाना अडचणीत असल्याने पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी मैदानात उतरण्यास बागल गटाने नकार दिला. त्यामध्ये आपल्याला अडचणीत आणण्यासाठी कारखाना अडचणीत आणला गेला पुन्हा ते खापर आपल्यावर नको अशी भूमिका घेत बागल यांनी माघार घेतली होती. तर दुसऱ्याच दिवशी जयवंतराव जगताप गटाच्या वतीने ही आपण माघार घेत असल्याबाबत सांगण्यात आले आहे. त्यामध्ये त्यांनी वरिष्ठ पातळीवर अपेक्षित असा प्रतिसाद मिळाला नसल्याचे व कारखाना चालू होण्यास अडचणी येऊ शकतात या हेतूने आपली भूमिका जाहीर केल्याचे सांगितले. यामुळे आता प्रमुख मातब्बर दोन्ही गट बाहेर झाल्याने राजकीय समीकरणे बदललेली दिसून येत आहेत.

politics

माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी वैयक्तिक गटाची भूमिका जाहीर केल्याने पाटील गटाची नेमकी भूमिका अद्यापही गुलदस्त्यात आहे. पाटील गटानी लढण्याचा निर्णय घेतल्यास संजयमामा शिंदे व प्रा. झोळ गट हे मैदानात त्यांच्यासमोर उभा ठाकलेले दिसून येणार आहेत. त्यामुळे जगताप गटाच्या भूमिके नंतर पाटील गट कोणती भूमिका घेतो. यावर आदिनाथची निवडणुकीचे चित्र दिसून येणार आहे. आज पाटील गटाची बैठक असल्याचे बोलले जात आहे. तर बागल समर्थक व जगताप समर्थक या दोन्ही गटांपैकी कोणाला साथ देतील यावरून निवडणुकांचे निकाल ही अवलंबून असणार आहेत. त्यामुळे माघार घेण्याच्या दिवसापर्यंत नवे ट्विस्ट बघायला मिळू शकतात.

आता पर्यत यांनी घेतली माघार …
नागनाथ लकडे, तुकाराम कोळेकर, अजिनाथ शिरगिरे, राजारा जाधव, रणजीत शिंदे, प्रकाश लोंढे आदिंनी दुपारी बारा पर्यत माघार घेतल्याचे दिसुन आले तर उद्या माघार घेण्याचा शेवट दिवस असणार आहे. परिसरात सध्या शुकशुकाट असला तरी अर्जदार माघार घेण्यासाठी येत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE