करमाळासकारात्मकसामाजिकसोलापूर जिल्हा

सरपंच परिषद व परिवर्तन प्रतिष्ठान यांच्या वतीने होमिओपॅथीक औषधे वाटप

प्रतिनिधी संजय साखरे 

कोरोना महामारी च्या साथीमध्ये केंद्रीय आयुष्य विभागाने सुचवलेले व रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे होमिओपॅथिक औषधांचे वाटप आजपासून सावडी गावातून सुरू करण्यात आले आहे .करमाळा तालुका सरपंच परिषद व परिवर्तन प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने करमाळा तालुक्यातील ग्रामीण भागातून दहा हजार होमिओपॅथिक औषधांच्या बाटल्या चे वाटप करण्यात येणार आहे.

होमिओपॅथिक औषधे उत्तम प्रकारे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. अनेक राज्यांनी होमिओपॅथिक औषधाने चांगल्या प्रकारे कोरोना रोगावर नियंत्रण आणले आहे .यात सामाजिक भावनेने संस्थेच्या वतीने छोटी मदत करण्याचा प्रयत्न आहे. प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन गावातील सरपंच, उपसरपंच ,ग्रामपंचायत सदस्य, ज्येष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत व आशा स्वयंसेविका मार्फत औषधांचे वाटप करण्यात येईल .ते औषध सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित घ्यावे व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी .कसलीही वैद्यकीय अडचण आल्यास आमच्या संस्थेशी संपर्क करावा असे आव्हान करमाळा तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष व परिवर्तन प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजुरी चे सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे यांनी केले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE