भुजबळांच्या भुमिकेनंतर जरांगेंचे स्पष्ट भुमीका ; फितुर आणि घरभेदींपासुन मराठ्यांनी सावध रहावे
करमाळा समाचार
आमची भुमीका मराठा समाजाला न्याय देण्याची आहे आणि आम्ही आता फक्त मराठा आरक्षणावर लक्ष केंद्रीत केले आहे. पुढचे काय म्हणतेत आम्हाला घेणेदेणे नाही. मराष्ट्रात दोन गटात वाद लावण्यासाठी करेंगे या मरेंगे अशी भुमीका त्यांची आहे पण आमची भुमीका फिक्स आहे. आम्ही लडेंगे और जितेंगे याच भुमीकेने जाणार. मराठ्यांना सगळ्या जाती सारख्या आहेत महाराष्ट्र अशांत करण्याचा आमचा कसलाही प्रयत्न नाही आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करीत राहु असे मराठ्यांचे प्रमुख मनोज जरांगे यांनी स्पष्ट केले.

मंत्री छगन भुजबळ यांच्या फोन कॉल रेकॉर्डींग बाबत त्यांना प्रश्न विचारले त्यावर ते बोलत होते. मराठा आरक्षणासाठी कुणबी दाखले मिळत होते त्यात आता भुजबळ यांनी अतिक्रमण होत आहे असे म्हणाले तर यावर विचारलेल्या प्रश्नावर जरांगे यांनी सोप्या भाषेत उत्तर दिले आहे. ते म्हणाले की, अजुन तर आम्हाला आरक्षण मिळालेले नाही मग अतिक्रमण कसे करणार आणि जरी मिळाले तरी तो आमचेच आहे आमचा हक्क आम्ही मागत आहोत. आता आम्ही ठरवलेय कोणी कितीही भडकवले तरी भडकणार नाही.

यापत्रकार परिषदेनंतर घेतलेला आढावा …
यासर्व विषयावरुन सध्या एक गोष्ट लक्षात येत आहे. ईडीच्या भितीने गप्प पडलेले नेते सत्तेत आल्यावर आपल्याच सरकारच्या विरोधात भुमिका घेण्याचे बोलु लागले आहेत. याचाच अर्थ सरकारची याला फुस तर नाही ना असा प्रश्न उपस्थीत होत आहे. तर जे जात विकुन मोठे झालेले मराठे व मराठा समाजाचे नेते छगन भुजबळांना खुले आव्हान देऊ लागले आहेत हेच मराठे ज्यावेळी जरांगे उपोषणला बसले होते तेव्हा कुठे होते असा प्रश्न आता सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते विचारु लागले आहेत.
जरांगे यांनी बोलताना सांगितले ज्यांनी आधी कधी महाराष्ट्र पेटवला असेल त्यांना पुन्हा पुन्हा तेच करायचे आहे पण मराठा समाज अशा कोणत्याही क्रियेला प्रतिक्रिया देणार नाही. म्हणजेच ओबीसींच्या आडुन मराठ्यांना कितीही डवचले तरी ते भडकणार नाहीत. पण एक गोष्ट नक्की पक्षाचे मराठे मात्र मुद्दाम आता सरकार मधे असलेल्या मंत्र्यावर बोलत आहेत. भुजबळ विरूध्द बीजेपी, शिंदे सेना वाद पेटला तर वावगे वाटणार नाही. हे न कळण्या इतपत मराठे पण दुधखुळे राहिले नाहीत.