करमाळाक्रिडाताज्या घडामोडी

विश्वकप २०२३ मध्ये लाजिरवाण्या पद्धतीने बाद केल्यामुळे बांग्लादेश रडारवर

करमाळा समाचार

वर्ल्ड कप 2023 मध्ये आज श्रीलंका विरुद्ध बांगलादेश असा सामना सुरू आहे. या सामन्यांमध्ये एक लाजिरवान्या पद्धतीने बाद करण्याचा ठपका बांगलादेश वर पडलेला दिसून येत आहे. यामध्ये या फलंदाजाला वेळेत पोहोचला नाही म्हणून बाद करण्यात आले आहे. याबाबतचे अपील बांगलादेशचा कर्णधार शाकीब उल हसन यांनी केले होते. यावर मेराईज इरासमस या पंचानी आऊट दिले आहे.

क्रिकेटच्या नियमाप्रमाणे एखादा फलंदाज बाद झाल्यानंतर पुढील येणारा फलंदाज 120 सेकंदाच्या पूर्वी फलंदाजी करण्यास किंवा पुढील चेंडू पडायला हवा असा नियम आहे. या नियमाचा फायदा घेत शाकीब हसन यांनी बादचे आपिल केले व या ठिकाणी मॅथ्यूज याला बाद देण्यात आले आहे. वास्तविक पाहता यामध्ये अँजेलो मॅथ्यूज याने कोणतीही चूक केल्याची दिसून येत नाही. त्यामुळे क्रिकेट जाणकारांकडून बांगलादेश व प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

फलंदाजी करत असताना श्रीलंका संघाचे चार फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानात मॅथ्यूज उतरला होता. तर त्याने येऊन स्ट्राईक घेतली. त्यावेळी 120 सेकंदाच्या आत मध्ये त्याने स्ट्राइक घेतली होती. तर नंतर त्यांनी आपल्या डोक्यावर असलेले हेल्मेट पूर्ण टाईट करत असताना त्यावेळी त्याची दोरी तुटली. त्यामुळे त्यांनी हेल्मेट बदलण्याची विनंती केली. परंतु त्यावेळेस पर्यंत एकही बॉल तो खेळलेला नव्हता. त्याच्यामुळे पुढील संघाच्या कर्णधाराकडून अपिल करण्यात आले व त्याच्या अपीलावर गंभीर विचार करत संबंधित फलंदाजाला बाद देण्यात आले आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE