करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

अहमदनगर टेंभुर्णी फक्त कागदोपत्रीच अजुन मोठ्या अडचणी जैसे थे ; आढाव्यात अडचणींचा पाढा

करमाळा समाचार

अहमदनगर टेंभुर्णी महामार्गावर टेंभुर्णी जातेगाव रस्त्याच्या नियोजनात करमाळा तालुक्यात अनेक त्रूटी आहेत. मागे मोजणी न करता जमीन हस्तांतरण व मोबदला मद्ये तफावत अशा प्रकारच्या तक्रारींचे निवारण होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन नियोजन करावे अशा सुचना अधिकाऱ्यांना देत मोबदल्यासाठी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करु शिवाय शेतकऱ्यांना जिथे अडचण येईल तिथे मी तुमच्यासोबत उभा राहिल असे आश्वासन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी करमाळा येथील आढावा बैठकीत दिले. पण काल झालेल्या बैठकीत मुळ अडचणी लक्षात आल्या बरेच प्रश्न मार्गी लागणे बाकी आहे हे लक्षात आले.

जातेगाव-करमाळा-टेंभुर्णी महामार्गामध्ये बाधित होणाऱ्या सर्व शेतकऱ्यांच्या भूसंपादनाच्या संदर्भातील अडचणी, तक्रारी व त्यांचे निवारण करण्याकरता आज खा.मा.धैर्यशील मोहिते पाटील यांचे अध्यक्षतेखाली या रस्त्याशी संबधित नॅशनल हायवेचे अधिकारी, प्रांतअधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, तहसिलदार, भुमीअभिलेख यांचे समवेत शुक्रवारी करमाळा पंचायत समिती सभागृहामध्ये बैठक संपन्न झाली यावेळी ते बोलत होते.

politics

यापूर्वी महाराष्ट्र सरकारच्या वतीने जमीन हस्तांतरित करण्यात आली होती. बऱ्याच जणांनी त्यावेळीही विरोध केल्याने हस्तांतरण रखडले होते. तर आता नव्याने काही ठिकाणी हस्तांतरित करणे गरजेचे आहे. पूर्वी राज्य सरकारकडे असणारा हा रस्ता आता केंद्र सरकारकडे वर्ग केल्यामुळे यामध्ये आता हस्तांतरित करण्यासाठी मोबदलाही वाढीव मिळू शकतो. तर मागे जाहीर केलेला मोबदला अद्यापही मिळाला नसल्याने आता कसा विश्वास ठेवायचा असाही प्रश्न लोकांनी उपस्थित केला.

शिवाय मागील हस्तांतरित केलेल्या जमिनींना केंद्र सरकारकडे मोबदल्यासाठी मागणी करावी अशी मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली. तर राज्य शासनाने अतिशय अल्प दरात जमिनीची खरेदी केल्याची तक्रार उपस्थित शेतकऱ्यांनी केली. त्यामुळे वाढीव रक्कम जोपर्यंत मिळत नाही किंवा ज्या पद्धतीने अहमदनगर भागातून मोबदला मिळालेला आहे त्या प्रमाणात मोबदला मिळत नसेल तर आम्ही जमिनीत देणार नाही असेही यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार नारायण पाटील, मा.जि.प सदस्या सविताराजे भोसले, भारतनाना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस ता.अध्यक्ष संतोष वारे, काँग्रेसचे ता.अध्यक्ष प्रताप जगताप, शिवसेनेचे ता.अध्यक्ष सुधाकर लावंड, शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश मंगवडे, जातेगाव ते टेंभुर्णी पर्यंतच्या महामार्गालगतच्या गावातील, नेतेमंडळी मान्यवर व बाधित शेतकरी उपस्थित होते.

यावेळी अहमदनगर व टेंभुर्णी येथील रस्त्याची तुलना होत असताना रस्त्याच्या रुंदीत फरक असल्याचे नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सुरुवातीला ४५ मीटर रुंदीचा रस्ता करण्याचे ठरले असताना रस्त्याची रुंदी अहमदनगर टेंभुर्णी पेक्षा कमी करण्यात आली आहे, आता केवळ ३० मीटर रुंदी ठेवण्यात आली आहे. तर ज्या ठिकाणी उड्डाणपूल आहे त्या ठिकाणी ४५ मीटर हा रस्ता केला जाईल. त्या पद्धतीने हस्तांतरित केले जाणार आहे. विशेष म्हणजे रस्ता जरी कमी रुंदीचा होत असला तरीही त्यामध्ये फोर लेन प्रमाणेच रस्ता होईल अशी ही माहिती यावेळी उप व्यवस्थापक अमित पांडे यांनी दिली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE