करमाळासोलापूर जिल्हा

शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या निवडी जाहीर ; अध्यक्षपदी शिंदे, उपाध्यक्षपदी शेटे यांची निवड

करमाळा समाचार

शासकीय पुनर्नियुक्त माजी सैनिक संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी बार्शी तालुक्यातील पानगाव चे मंडळ अधिकारी शरद शिंदे यांची तर उपाध्यक्ष म्हणून करमाळा तालुक्यातील जिंती येथील तलाठी संजय शेटे यांची निवड झाली आहे. यावेळी सर्व निवडी या बिनविरोध घोषित करण्यात आल्या.

अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्याने सदर निवडी ह्या अविरोध झाल्या आहेत. यामध्ये अध्यक्षपदी शरद शिंदे, उपाध्यक्षपदी संजय शेटे, सचिव विकास रणदिवे, कोषाध्यक्ष शिवाजी माने, सहसचिव सुरेश कदम यांच्या निवडी बिनविरोध झाल्या आहेत.

यावेळी दीपक साठे, प्रमोद जाधव सल्लागार, आप्पासाहेब काळेल पंढरपूर तालुका अध्यक्ष, समाधान पाटील माळशिरस तालुका अध्यक्ष, सुनील चंदनशिवे यांची बार्शी तालुका अध्यक्षपदी निवड झाली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE