कोविड केअर मधुन घरी जाताना प्रत्येकाला झाडाचे वाटप ; इतर कोविड सेंटर प्रमुखांनी संपर्क साधण्याचे आवाहन
करमाळा समाचार
कालिंदा फाऊंडेशन, वेणु व्यंकटेशा चॅरिटेबल ट्रस्ट रावगांव, यांच्या वतीने करमाळा तालुक्यातील प्रत्येक गावातील व रावगांव येथील लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मधील प्रत्येक पेशंटला डिस्चार्ज देताना आपल्या ट्रस्टच्या वतीने एक झाड भेट देण्यात येत आहे.

आज आपणाला ऑक्सिजन विकत घ्यावा लागत आहे. म्हणून सर्व विश्वस्त मंडळ यांच्या वतीने हा उपक्रम राबविला आहे. यावेळी बोलताना ट्रस्टचे संस्थापक लक्ष्मण बुधवंत म्हणाले की, लोकांना जाताना आमच्या वतीने शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या उपक्रमाला सुरुवात केली आहे. तरी ही योजना तालुक्यातील प्रत्येक कोविड केअर सेंटर साठी असणार आहे. त्यामुळे कृपया प्रत्येक गावातील कोवीड केअर सेंटरच्या प्रमुखांनी 9370835284 या नंबरवर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
रावगांव येथील लोकसहभागातून उभारण्यात आलेल्या कोविड केअर सेंटर मधील पेशंटला झाड देताना रावगांव मा.उपसरपंच सुभाष पवारसाहेब उपस्थित डॉ शिंदे मॅडम, नवनाथ ससाणे सर, भास्कर भाऊ पवार, प्रशांत शिंदे,
