करमाळ्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्याच्या घरी धाडसी चोरी ; गुन्हा दाखल
करमाळा समाचार
करमाळा येथील पशुवैद्यकीय अधिकारी विक्रम कारंडे हे घरात असताना त्यांच्या घरी अनोळखी चोरांनी प्रवेश केला व घरातील एकूण तीन लाख 41 हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. सदरची चोरी एमआयडीसी येथे पहाटे साडेचार च्या सुमारास झाली आहे.
कारंडे हे एमआयडीसी येथे राहतात. दिनांक 2 रोजी नेहमीप्रमाणे जेवण उरकून कारंडे व त्यांची आई हे झोपी गेले, पहाटेच्या वेळी पाहिले असता कोणीतरी अनोळखी लोक घरात आल्याचे दिसून आले. त्यावेळी आरडाओरडा केला व त्यांचा पाठलाग केला पण चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.
चोरी करण्यासाठी दोघेजण आले होते. शरीराने सडपातळ, मध्यम उंचीचे , वय अंदाजे 25 ते 35 दरम्यान तर अंगामध्ये काळ्या रंगाचे पॅन्ट शर्ट घातले होते. यावेळी घरातील साहित्य तपासले असता साडेसहा तोळे वजनाचे दागिने चोरीस गेल्याचे दिसून आले आहे. यावरून करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहे.