धक्कादायक : करमाळा पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या !
करमाळा समाचार
करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. संबंधित कर्मचाऱ्याने आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन सदरचा प्रकार दि ७ रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास उघडकीस आला. नेमके कारण काय घडले असावी हा अद्याप उलगडा झाला नाही. करमाळा पोलिस तपास करीत आहेत.

आकाश तोगे (वय २६) असे त्या कर्मचाऱ्यांची नाव असून काही दिवसांपूर्वी करमाळा येथे बदली होऊन आले होते काल करमाळा येथे पोलीस ठाण्यात अतिशय शांत दिसणारी तोगे अचानक असे काही करतील असे कोणालाही वाटत नव्हते. तोगे हे त्यांच्या पत्नीसह करमाळा येथे राहतात. त्यांची पत्नीही पोलीस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. रात्री पत्नी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना आकाश एकटेच घरी होते.

आकाश फोन उचलत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांची पत्नी घरी गेल्या. त्यावेळी त्यांनी पाहिले असता सदरचा प्रकार उघडकीस आला. नेमके काय घडले व एवढे टोकाचे पाऊल आकाश तोगे यांनी का उचलले हे अद्याप समोर जाऊ शकले नाही. पण एक मनमिळाऊ असा कर्मचारी गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.