करमाळासोलापूर जिल्हा

.. तर आदिनाथ चालवण्यासाठी आपण उत्सुक – शिंदे

करमाळा समाचार- संजय साखरे

पांडे तालुका करमाळा येथील कमला भवानी रिफाइंड शुगर चा सहावा बॉयलर प्रदीपन सोहळा सकाळी दहा वाजता आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष श्री वामन दादा बदे, संचालक पोपटराव सरडे, कंदर चे प्रगतशील बागायतदार भास्कर अण्णा भांगे व आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक श्री आशिष गायकवाड यांच्या शुभ हस्ते पार पडला.

कमलाभवानी रिफाइंड शुगरचे यावर्षी विस्तारीकरण केले असून कारखान्याची दैनिक गाळप क्षमता प्रतिदिन सहा हजार मेट्रिक टन इतकी केलीआहे. यावर्षी कारखाना पूर्ण क्षमतेने चालेल, ब्राझीलमध्ये पडलेल्या दुष्काळामुळे भारतातील साखर उद्योगाला चांगले दिवस आले असून यावर्षी साखरेची मागणी चांगली राहील. कारखान्याकडे यंदा अकरा लाख मे टन उसाची नोंदणी झालेली असून कारखान्यांनी या वर्षी नऊ लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. कारखान्याची सर्व यंत्रणा सज्ज असून जामखेड व परांडा या गटातील चांगल्या प्रतीचा ऊस कारखान्यास गाळपासाठी येईल असे कारखान्याचे संस्थापक चेअरमन श्री विक्रम दादा शिंदे यांनी सांगितले. यासाठी सर्व कर्मचारी, शेतकरी, खातेप्रमुख यांनी सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.

तर आदिनाथ कारखाना चालविण्यास घेऊ– करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना बारामती अग्रो ने चालविण्यास घेतला नाही तर कमला भवानी शुगर मार्फत हा कारखाना आम्ही चालवण्यास घेऊ आणि हा गाळप हंगाम यशस्वी करून दाखवू असेही विक्रम दादा शिंदे म्हणाले.

यावेळी कारखान्याचे डायरेक्टर जनरल श्री डांगे साहेब, सुजित तात्या बागल, वामनदादा बदे, यांची भाषणे झाली. यावेळी सुजित तात्या बागल, आसपाक जमादार, तात्या मामा सरडे ,युवराज गपाट, मानसिंग खंडागळे, समाधान भोगे ,,सचिन काळे, मुरूमकर, विठ्ठल सरडे, डायरेक्टर जनरल डांगे साहेब, जनरल मॅनेजर गिरमे साहेब यांच्यासह पत्रकार बांधव, ऊस उत्पादक शेतकरी, खातेप्रमुख व कर्मचारी उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE