करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

अनोळखी वाहन अपघातानंतरही धावताना दिसले ; दोन ठिकाणी सिसिटिव्हीत दिसली कार गाडी

करमाळा समाचार 

शेतीत पाहणी करण्यासाठी गेलेल्या दांपत्याला अज्ञात वाहनाने धडक दिल्यानंतर वृद्धाचा मृत्यू झाला आहे. तर सोबत असलेली महिला गंभीर जखमी झाली आहे. यावेळी अज्ञात वाहन वेगवान गतीने निघून गेले. संबंधित ठिकाणी जखमी व्यक्तींना दवाखान्यात नेण्याची तसदीही त्याने घेतल्याचे दिसून आले नाही. संबंधित वाहनाचा पोलीस तपास घेत आहेत. सदरचा प्रकार हा २ नोव्हेंबर रोजी सकाळी साडेआठच्या सुमारास पांडे शिवारात घडला आहे.

सदर अपघातात वसंत रंगराव वीर (वय ८४) रा. पांडे हे मयत झाले आहेत. तर लक्ष्मी वसंत वीर या गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अनोळखी चालक व वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

politics

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, २ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे वीर दांपत्य हे पांडे शिवारातील शेती पाहण्यासाठी मोटारवाहन (क्रमांक एम एच ४५ व्ही ७९२३) घेऊन आलेले होते. यावेळी रस्त्याच्या कडेला मोटारवाहन उभा असताना सकाळी साडेआठच्या सुमारास एक अनोळखी वाहन प्रमुख रस्ता सोडून रस्त्याच्या खाली उतरले व रस्त्यापासून काही अंतरावर उभा असलेल्या वीर दांपत्याला जाऊन धडकले. यामुळे जबरदस्त गंभीर जखमी झालेले वसंत वीर हे दवाखान्यात उपचार करण्यापूर्वीच मयत झाले. तर लक्ष्मी वीर या गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर करमाळा येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. अपघात एवढा जबर होता की यातून वसंत वीर हे वाचू शकले नाहीत.

सदरची गाडी ही रस्त्यात असलेल्या पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेरेत दिसून येत आहे. यावरून पोलिसांनी शोधही घेण्यास सुरुवात केली आहे. सदर गाडीचा तपास लागल्यानंतर नेमके कारण स्पष्ट होणार आहे. शिवाय या मागचा गुन्हेगारही समोर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सदर घटनेचा वेगवान तपास करावा अशी मागणी नातेवाईकांकडून केली जात आहे.

पोलिसांकडुन शोध …
सुरुवातीला पहिल्या सीसीटीव्ही कॅमेरे मधून सदर गाडी जात असताना स्वच्छ व वेगात जाताना दिसत आहे. पण नंतर पुढील सीसीटीव्ही मध्ये सदरची गाडी ही पुढच्या टायर पंचर अवस्थेत असतानाही धावताना दिसत आहे. तर गाडी चालक व सोबत बसलेली एक महिला दिसून येऊ नये म्हणून पडदेही टाकलेले दिसत आहेत. त्यामुळे या गाडीवरील संशय बळावला आहे. त्या गाडीचा पोलीस शोध घेत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE