करमाळा येथील शिवसेना पक्षाच्या कार्यालयाला प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी सदिच्छा भेट

प्रतिनिधी | करमाळा


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या रूपाने संपूर्ण महाराष्ट्राला एक आधारस्तंभ वाटावा असा मुख्यमंत्री मिळाला असून त्यांच्या माध्यमातून तालुक्यातील संपूर्ण जिल्ह्यातील सर्व रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी पदाधिकारी कटिबद्ध आहोत. आता पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी त्यांना न्याय देण्यासाठी सक्रिय व्हावे असे आवाहन शिवसेनेचे नेते प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी केले आहे.

आज करमाळा येथील शिवसेना पक्षाच्या कार्यालयाला प्राध्यापक शिवाजी सावंत यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी औपचारिक रित्या शिवसेनेकांशी गप्पा मारल्या. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, शहर प्रमुख संजय आप्पाची शीलवंत, उपशहर प्रमुख राजेंद्र काळे, नागेश गुरव, पिंटू गायकवाड, हिवरवाडी शाखाप्रमुख आजिनाथ इरकर , शेलगावचे सरपंच अंकुश जाधव, पांडे तंटामुक्त अध्यक्ष आप्पा आंधळकर, उद्योजक सुनील वायकर, महेश दिवाण, सचिन पांढरे,
नागेश चेंडगे, संजय जगताप आदि पदाधिकारी उपस्थित होते.

एकनाथ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सहकार्यातून माध्यमातून करमाळ्यात नव्याने उभा होत असलेल्या स्वातंत्र्यसैनिक मनोहर पंत गणपत चिवटे ब्लड बँकेची प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांनी पाहणी केली. करमाळा तालुका व शहर शिवसेनेच्या कामकाजाबद्दल प्राध्यापक सावंत यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांनी लवकरच करमाळा शहरात शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीने व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून मोफत डायलिसिस सेंटर उभा करून किडनी पेशंटला मदत करण्याचा मनोदय व्यक्त केला.

DMCA.com Protection Status
error: Don\'t try to copy. Content is protected !!