जिल्हा परिषदेचे जिल्हास्तरीय पुरस्काराचे जाहीर – उद्या वितरण ; यादव व जाधव यांची निवड
करमाळा समाचार
प्राथमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद सोलापूर यांच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. सदर पुरस्कार वितरण उद्या दुपारी दोन वाजता सोलापूर येथे होणार आहे. यामध्ये करमाळा तालुक्यातील दोघांचा समावेश आहे.

सोलापूर येथे हुतात्मा स्मृती मंदिर दुपारी दोन वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मंत्री उच्च व तंत्रशिक्षण वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सोलापूर जिल्हा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते व खा.ओमप्रकाश निंबाळकर, खा. धैर्यशील मोहिते पाटील व खा. प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत होणार आहे.

करमाळा तालुक्यातील दोघांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये सर्वसाधारण जागेसाठी उमरड शाळेचे अनिल यादव व शिष्यवृत्ती विभागातुन वांगी क्रमांक एक येथील सुवर्णा सर्जेराव जाधव यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.