करमाळासोलापूर जिल्हा

महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे कौतुकास्पद काम ; थंडीच्या कडाक्यात रात्रभर जागुन केले 11 kv चे काम

करमाळा समाचार – दिलीप दंगाणे 

वीज बिल वसुली वरून कायमच कर्मचारी व शेतकऱ्यांमध्ये वाद होताना दिसतात. पण कर्मचारी हे त्यांचे काम वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे करत असतात. तरीही त्यांना लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागते. पण लोकांसोबत कितीही वाद झाले तरी ते आपल्या कामात कसूर करत नाहीत. असाच र्क प्रत्यय नुकताच कुंभारगावसह इतर गावांना आला आहे.

रेल्वेचे काम सुरू असताना जिंती फिडर ची अकरा केवी ची केबल ही नादुरुस्त झाली होती. सदर केबलमुळे कुंभारगाव, देलवडी, घरतवाडी व जिंतीचा काही भाग मागील तीन दिवसांपासून अंधारात होता.

याबाबत महावितरण चे अधिकाऱ्यांना माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सदर केबल मागवली व त्याठिकाणी काम करण्याच्या सूचना दिल्या. परंतु केबल हि रात्री उशिरा दिनांक चार रोजी अकरा वाजता पोहोचली. कर्मचाऱ्यांनी ठरवले असते तर हे काम पहाटेपासून किंवा पाच तारखेपासून हे सुरू करू शकले असते.

पण विजय जोशी काका, फिरोज शेख, अण्णा मोरे यांनी क्षणाचाही विलंब न करता रात्रीतच कामाला सुरुवात केली. अपेक्षेपेक्षा यंदा थंडी थोडी जास्तच आहे. मागील दोन दिवस पाऊस पडलेला त्यात रात्रभर धुके, गारवा अशा परिस्थितीत या कर्मचाऱ्यांनी कामाला सुरुवात केली आणि रात्रीत काम आटपून पहाटे संबंधित गावांना वीज पुरवठा करण्याचे काम केले.

त्यामुळे कायमच लोकांच्या रोषाचे सोपे माध्यम म्हणजे कर्मचारी असतात. पण ते रात्री अपरात्री दिवसाही आपला जीव धोक्यात घालून आपल्यासाठी कार्यरत असतात हे लोकांनी ही ध्यानात ठेवत त्यांच्यावर रोष न व्यक्त करता. कामातील सेवेचा आदर करायला पाहिजे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE