पावसाने पाठ फिरवल्याने चिंताजनक स्थिती ; खरीप हंगाम धोक्याच्या उंबरठ्यावर
दिलीप दंगाणे – जिंती
पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगाम धोक्याच्या उंबरठ्यावर आहे. जून महिन्यात पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील बाजरी, तूर, मका, मटकी, सोयाबीन, खरीप कांदा इत्यादी पिकांच्या पेरण्या केल्या. पण तुर पिकाला शेंगा अवस्थेत असताना शेंड आळीचा सामना करावा लागत आहे.

तसेच मका पिकांना कणसे धारण करण्याच्या अवस्थेत तर काही मका फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये आहेत अशा परिस्थितीमध्ये असताना पावसाचा विलंबामुळे खरीप हंगामातील सर्व पिके पावसाअभावी सुकून चाललेली आहेत. खरीप कांदा हवामानातील उष्णतेमुळे व पावसाच्या विलंबामुळे कांदा पीके जळून चालली आहेत. आडसाली ऊसावरती तांबोळ्या रोगाचे सावध दिसून येत आहे.

चार-पाच दिवसात पाऊस झाला नाही. तर पुन्हा शेतकरी आर्थिक संकटात सापडेल आधीच शेतकरी लाँकडाऊन मुळे शेतकरी मेटाकुटीला आलेला असताना पुन्हा या दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे. ग्रामीण भागातील आठवडी बाजार बंद असल्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा हा जगाचा पोशिंदा असल्यामुळे चार ते पाच दिवसात पाऊस न झाल्यास नुकसानग्रस्त पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच शेतसारा माफ करावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
मी जिंती मुख्यालयातील 20 ते 25 प्लॉटची घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तुर पिकाला शेंगा अवस्थेत आहेत. मका पिके फुलोऱ्याच्या अवस्थेत तर काही मका पिके कणसे धारण करण्याच्या अवस्थेत आहेत. पिके जोमात आले आहेत. परंतु पावसाचा विलंबामुळे पिके सुकून चाललेले आहेत. तर खरीप कांदा पिके रोपाच्या अवस्थेत आहेत. त्यावरती रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. पावसाचा विलंबामुळे खरीप हंगामातील पिके धोक्याच्या उंबरठ्यावर आहेत.
– जिंती मुख्यालय विनोद सोनवणे, कृषी सहाय्यक जिंती सज्जा
माझी तीन एकर मका असून त्यावर ती लष्करी आळी लोकरी मावा असल्यामुळे माझा पूर्ण मकेचा प्लॉट नष्ट होत चालला आहे तसेच तूर पिकावरती शेड आळी पडल्यामुळे व पावसाच्या विलंबनामुळे माझे आर्थिक नुकसान होत आहे
-सुकुमार दोभाडा
शेतकरी जिंती
मोठे पाऊस न झाल्यामुळे विहिरीची बोरवेल ची पाण्याची पातळी खाली गेली आहे त्यामुळे पिके जगवणे कठीण झाले आहे.
-विलास पवार शेतकरी जिंती