करमाळासोलापूर जिल्हा

ठेकेदाराच्या हुशारीने चोरांना रंगेहाथ पकडले ; दोन जणांवर गुन्हा दाखल

करमाळा समाचार 

रेल्वे बोगद्याच्या दुरुस्तीसाठी स्टील मागवल्यानंतर त्या स्टील मध्ये अपहार करुन १४५० किलो वजनाचे स्टील चोरुन तब्बल ६३ हजारांची फसवणुक केल्याप्रकरणी ट्रांसपोर्टच्या मालट्रकवरील दोघांवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे. रिकामा ट्रक वजन करण्यासाठी नेल्यावर सदरचा प्रकार उघडकीस आला आहे. रस्त्यात ट्रक थांबऊन वजन वाढ दिसण्यासाठी गोणी काढताना रंगेहाथ सापडले होते. ही घटना दि १३ रोजी दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली.

चालक दिगंबर विश्वनाथ शिंदे रा.निडळ ता ल खटाव जि. सातारा व त्याचे सोबत असलेला अमोल ज्ञानेश्वर घोरफडे रा. सातारा यांच्यावर दि १४ रोजी गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी विजय रामभान दवंगे (वय ३६) रा.धारणगाव रोड संभाजी महाराज चौक कोपरगाव जि.अहमदनगर यांनी फिर्याद दिली आहे.

दोन महिन्यापुर्वी जिंती गावचे शिवारातील रेल्वे गेट पुल नं.२६ च्या भोगद्या दुरुस्त करण्याचे काम चालु केलेले होते. त्याकामाकरीता लागणारे एकुण २० टन ५८० लोखंडी स्टील दि १२ रोजी पुणे येथुन घेतले. स्टील घेतलेल्या कुबेर कंपनीने त्यांचे मार्फत ज्योती ट्रान्सपोर्ट कंपनीकडील माल ट्रक क्रमांक (एम. एच. ४६ ए. आर. ६७६१) मध्ये भरुन पाठवले.

वजनकाट्यावर मालट्कचे वजन करुन घेऊन दि १३ रोजी दुपारी चारला जिंती येथे पोहचले. त्यावेळी ट्रक मधील लोखंडी स्टील मोजल्यानंतर कमी भरु लागले. याबाबत चालक शिंदे याला कल्पना दिली पण त्याने बरोबर असल्याचे सांगितले. त्यानंतर मालट्रक मधील स्टील खाली करुन ट्रक वजनकाटा करण्यासाठी कुरकुंभ जिल्हा पुणेच्या दिशेने घेऊन जात असताना मध्येच रस्त्यावर थांबऊन ट्रक चे दोन्ही चालक शिंदे व घोरपडे हे ट्रक च्या खालील कप्प्यातील डस्टच्या गोणी खाली करीत होते. यावेळी दोघानाही रंगेहाथ पकडल्याने त्यांनी कबुली दिल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे. यावेळी स्टील मधुन ३२ एमएम ६ बार, २५ एम एम १० बार, २० एम एम ७ बार, १० एम एम ४४ बार असे एकुण १४५० किलो वजन व ६३ हजार किंमतीचे स्टील चोरल्याचे आढळले यावरुन दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास हवालदार संतोष देवकर हे करीत आहेत.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE