महाराष्ट्र राज्य कुस्तगीर परिषदेचे नुतून सरचिटणीस अर्जूनविर काकासाहेब पवार यांची सावडी येथे भेट
समाचार टीम
महाराष्ट्र राज्य कुस्तगीर परिषदेचे नुतून सरचिटणीस अर्जूनविर काकासाहेब पवार यांनी नुकतीच पैलवान सतिश बापू शेळके यांच्या घरी त्यांची सदिच्छा भेट घेतली, त्या वेळी नुतुन निवडीबद्दल त्यांचा सावडी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

त्यावेळी उप महाराष्ट्र केसरी किरण भगत, आशियाई पडक विजेता महेंद्र गायकवाड, उप हिंद केसरी तुषार दुबे आणि महाराष्ट्र च्याम्पियन उदय शेळके यांचा ही सत्कार करण्यात आला, या वेळी सरपंच भाउ शेळके, उप सरपंच महेंद्र एकड, निलेश एकाड, काशिनाथ काकडे, प्रकाश एकाड, दत्ता शिंदे, आबा देशमुख, राजू देशमुख, हनुमंत एकाड, तात्या शेळके व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
