करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

आदेशानंतरच्या आंदोलनासाठी सकल मराठा करमाळा सज्ज ; साखळी उपोषण तात्पुरते स्थगीत

करमाळा समाचार

सकल मराठा समाजाच्या वतीने आज साखळी उपोषण स्थगित करणे बाबत निवेदन दिले आहे. तर येणाऱ्या काळात मुंबई असो किंवा इतर कोणतेही आंदोलनात करमाळा तालुका सर्वातआदी हजर राहणार अशी ग्वाही देत करमाळा तालुक्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार विजयकुमार यांना निवेदन देण्यात आले. यावेळी पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे उपस्थित होते.

मराठा आरक्षणासाठी श्री मनोज जरांगे पाटील यांनी पुकारलेल्या आंदोलनाला करमाळा तालुक्यातुन मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्या अनुषंगाने गावोगावी सुरू असलेले आंदोलने व करमाळा शहरात सुरू असलेले साखळी उपोषण मागील आठ दिवसापासून सुरू आहेत. तर गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिष्टमंडळाशी झालेल्या चर्चेनंतर श्री मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन वेगळ्या पद्धतीने सुरू ठेवण्याची दिशा ठरवली आहे. त्यामुळे श्री जरांगे यांनी अमरण उपोषण मागे घेतले आहे. त्यामुळे सकल मराठा समाज करमाळा तालुका यांच्यावतीने सुरू असलेल्या साखळी उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात येत आहे. तर येणाऱ्या काळात श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार पुढील दिशा निश्चित केली जाईल.

तरी मागील सात दिवसापासून करमाळा तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी आंदोलने झाली. प्रत्येक ठिकाणी शांततेत आंदोलन करण्याचा सकल मराठा समाजाचा प्रयत्न राहिला आहे. पण तरी काही ठिकाणी मराठा आंदोलनाचा फायदा उचलत काही लोकांनी जाळपोळ व दगडफेक केल्याचे दिसून आले. त्यामध्ये गैरसमजुतीमधून काही मराठा बांधवांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याची चौकशी करून सदरचे गुन्हे मागे घेण्यात यावे मागणी केली आहे. यावेळी मोठ्यासंख्येने सकल मराठा बांधव उपस्थित होते.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE