मनसेच्या पत्राची आठवण करुन देताच काम मार्गी ; नियोजनशुन्य कारभारा विरोधात मनसे मैदानात
करमाळा समाचार
महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा तालुका व शहर च्या वतीने उपजिल्हा रुग्णालयात येथे लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांना सावली साठी मंडप व खुर्च्या ची व्यवस्था करण्यात यावी यासाठी 20/3/2021च्या पत्राची उपजिल्हा रुग्णालयाच्या डाॅक्टराना आज संजय (बापु) घोलप मनसे तालुका अध्यक्ष यांनी फोन द्वारा आठवण करून दिली.

फोन नंतर प्रशासन जागे मंगळवारी दि.6/4/2021 रोजी कोणत्याही परिस्थितीत मंडप व खुर्च्या ची व्यवस्था करू असे संमधीत डाॅक्टरांनी शब्द दिला.

या वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे . जि.उपाध्यक्ष राजेंद्र मोरे,ता उपाध्यक्ष, अशोक गोफणे,ता.उपाध्यक्ष मा.राजाभाऊ बागल , शहर अध्यक्ष नानासाहेब मोरे, जि. म. न. वि से संपर्क अध्यक्ष मा. विजय रोकडे, करमाळा ता.संपर्क अध्यक्ष मा.रामभाऊ जगताप, म. न. वि.से. जि. अध्यक्ष मा.सतिश फंड, जि.उपाध्यक्ष म.न.वि.से मा.आनंद मोरे , शहर अध्यक्ष म.न.वि.से मा.सचिन कणसे, शहर अध्यक्ष उद्योजक आघाडी मा.अरीफ पठाण, शहर उपाध्यक्ष मा.रोहित फुटाणे, शहर उपाध्यक्ष मा.अजिंक्य कांबळे, सो.जि.म.न.वि.से प्रसिद्धी प्रमुख मा.महेश डोके मा.अनिल माने योगेश काळे,अमोल जांभळे,राजा कुभांर, विजय हजारे, योगेश काळे, स्वप्निल कवडे आदि उपस्थित होते.