करमाळासोलापूर जिल्हा

विवाहीत महिलांचा छळ होत असेल तर रेहनुमा संस्था लक्ष घालणार

करमाळा प्रतिनिधी सुनिल भोसले


रहेनुमा चारिटेबल सोशल वेल्फेअर संस्थेच्या वतीने युवा – युवतीचा भविष्यकाळ या विषयावर प्रबोधन कार्यशाळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी बोलताना प्रा.काझी म्हणाले युवा युतीने स्व-आत्मपरीक्षण, आत्मविश्वास, आत्मनिर्भय ठेवून एक सक्षम जागरूक नागरिक बनणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन रहेनुमा चारिटेबल सोशल वेल्फेअर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. हाजी कलीम काझी सर यांनी केले.

रहेनुमान चारिटेबल ट्रस्टच्यावतीने युवा – युवती चा भविष्यकाळ या प्रबोधन पर कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष हाजी लालूमिया शेख हे होते. याप्रसंगी बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष ईसाक पठाण, रहेनुमा चारिटेबल संस्थेचे सचिव सुरज शेख, रहेबर फाऊंडेशनचे संस्थापक इम्तियाज पठाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष आझाद शेख, रहेनुमा चे सदस्य मुस्‍तकीम पठाण, जमीर बागवान, राजू सय्यद शाहरुख नालबंद, युनूस पठाण, राजू नालबंद फिरोज मुलानी, शहाजान शेख, समशेर मदारी, जावेद पठाण, आशिष पठाण, सुलतान गोंडी शेख उपस्थित होते.

पुढे बोलताना काझी सर म्हणाले की, गुजरात आमदाबाद येथील आयशा हिला वैवाहिक अत्याचार पतीकडून छळ हुंड्याची मागणी या कारणाने तिने आत्महत्या केली. वास्तविक पाहता ही दुर्दैवी घटना आहे अशाप्रकारे यापुढे होऊ नये याकरिता रहेनुमा चारीटेबल वेल्फेअर संस्थेच्या वतीने मुलींना संरक्षण दिले जाईल. हुंड्यासाठी छळ होत असेल तर कोर्ट कचेरी चे मोफत सल्ला व कामे केली जातील. हुंडा घेणे देणे ही समाजातील विकृष्ट प्रथा समूळ नष्ट करण्याचा संकल्प या वेळी करण्यात आला. प्रस्ताविक कय्युम शेख यांनी केले शेवटी आभार फिरोज शेख यांनी मांडली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE