एकाच दुकानात दुसऱ्यांदा चोरीचा प्रयत्न तर देवळालीत चोरी ; चोर सीसीटीव्हीत
करमाळा समाचार
करमाळा व देवळाली येथील प्रमुख रस्त्यावर असणाऱ्या दोन दुकानांमध्ये चोरट्याने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात देवळाली येथे चोरी केली तर करमाळ्यात मात्र दुसऱ्यांदा गायकवाड यांचे दुकान फोडण्यापासून वाचले आहे. सदरचा प्रकार वारंवार घडत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले असून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

करमाळा बस स्थानक शेजारी डॉ. पवार यांच्या हॉस्पिटल जवळ अशोक गायकवाड यांचे इलेक्ट्रिकल्स चे दुकान आहे .या ठिकाणी मोटार रिवायडींग व इतर साहित्य मिळते. त्या दुकानातून छोटे-मोठे व्यापारी हे रिवायडींग करण्याची वायर व इतर वस्तू घेऊन जात असतात. अशा दुकानातून महागड्या वस्तू मिळू शकतात त्या हेतूने सदर दुकानात चोरी करण्याचा हा दुसरा प्रयत्न पुन्हा एकदा फसला आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात तर दुसऱ्यांदा काल ही चोरी करण्याचा प्रयत्न झाला.

तर देवळाली येथे मोटार रिवायडींग दुकान असलेले राजू माने यांच्या दुकानातून चोरी झाली आहे. चोरट्यांनी महागड्या वस्तू नेल्या आहेत. देवाअली इथे मध्यरात्री देवळाली येथील बस थांब्या जवळ असलेल्या दुकानात ही चोरी झाली आहे. या ठिकाणाहून रिवायडींग वायर व मोटार चोरीला गेल्याची माहिती मिळत आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे पुढील कार्यवाही सुरू आहे.
चोरांना आता सीसीटीव्ही सारख्या पर्यायांचाही धाक उरलेला नाही. तोंडाला बांधून सदरचे चोर या चोऱ्या करीत आहेत. यामुळे परिसरातून गस्त वाढवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशा चोरांवर वेळीच पायबंद घातल्यास मोठी चोरी टळू शकते. त्यामुळे लवकरात लवकर या चोरांचा तपास लावावा अशी मागणी परिसरातून होत आहे. तर संबंधित दोन्ही ठिकाणी जे चोर एकच असल्याचा संशय सध्या व्यक्त केला जात आहे.