E-Paperताज्या घडामोडीसोलापूर जिल्हा

इंदोर अंमळनेर बसचा अपघात ; अपघातात तेराचा पाण्यात बुडुन मृत्यू दोन महाराष्ट्रातले

समाचार टीम –


इंदुर हुन निघालेली बस सकाळी साडे सात वाहता निघाली होती. सकाळी सव्वा दहाच्या सुमारास बसला अपघात झाला. ती बस नर्मदा नदीत (धार, मध्यप्रदेश) कोसळली त्यात चालकासह तेरा प्रवाशी मयत झाल्याची माहीती समोर येत आहे. सदरची बस महाराष्ट्र जळगावची आहे. मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराह चव्हाण यांनी सदरची माहीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली आहे.

चद्रकांत एकनाथ पाटील चालक, प्रकाश चौधरी वाहक अशी मयत असलेल्या दोघांची नावे स्पष्ट झाली आहेत. अधिक माहीती घेण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सकाळी बस मध्ये पन्नास ते पंचावन्न लोक प्रवास करीत असल्याची माहीती आहे. पण जेव्हा बस धडकुन पाण्यात पडली त्यावेळी त्यातुन तेरा जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत.

मृतांचे ओळख पटवण्याचे काम सुरु असुन मोटारसायकल चालकाला वाचवण्यासाठी सदरची दुर्घटना घडल्याचे बोलले जात आहे. सदरचा अपघात मध्य प्रदेश मधील धार मध्ये झाले आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी माहीती घेतलीय. घटनास्थळी सर्व यंत्रणा पोहचली आहे. त्याठिकाणी सगळे मृत शरीर व बस बाहेर काढण्यात आली आहे.

बस मध्ये तेराच जण असल्याची माहिती समोर येत आहे. पण सुरुवातीला मध्यप्रदेशच्या गृहमंत्र्यांनी सांगितले होते की त्या ठिकाणी 50 ते 55 लोक असतील. त्यानंतर मृत प्रवाशांना तात्काळ दवाखान्यात पाठवत असताना बऱ्याच जणांना वाटले की जखमींना पाठवले जात आहे . त्यामुळे नेमका आकडा किती होता हा कळू शकत नव्हता. पण आता खात्रीशीर माहिती मिळत आहे की बस मध्ये फक्त 13 जण होते. त्यामध्ये बस वाहकाचाही  समावेश आहे. शिवाय बस मध्ये एक जण अतिरिक्त चढल्याची माहिती मिळत आहे त्याचा शोध घेतला जात आहे.

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी तात्काळ यासंबंधी लक्ष घालून संबंधित यंत्रणा त्या दिशेने पाठवले आहे. तर महाराष्ट्रातील जे मृतक आहेत त्यांच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची आर्थिक मदत ही जाहीर केल्याची माहिती समोर येत आहे.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE