अतुल पाटील समर्थकांच्या आनंदावर विरजण ; सभापती निवडीत नवीन वळण
करमाळा समाचार
सदस्यांना वेळेवर माहिती न पोहोचल्याने काही सदस्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे आक्षेप नोंदवला मुळे आजची निवड रद्द करण्यात आले असून पुढील कारवाई येत्या आठ दिवसानंतर होण्याची शक्यता असल्याचे तहसीलदार समीर माने यांनी सांगितले.
सभापती गहीनीनाथ ननावरे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर दिनांक एक जुलै रोजी नव्या सभापती निवडी संदर्भात जाहीर करण्यात आले होते. परंतु काही सदस्यांना सदरची नोटीस ही मागील तीन दिवसांपूर्वी मिळाली नियमाप्रमाणे सदरची नोटीस आठ दिवसापूर्वी येणे अपेक्षित असल्याचे सर्व संबंधित सदस्यांचे म्हणणे होते. तरी या प्रकरणी राहुल सावंत यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केल्यानंतर सदर ची निवड ही रद्द ठरवण्यात आले असून पुढील तारीख लवकरच घोषित केली जाईल अशी माहिती तहसीलदार समीर माने यांनी दिली.
