करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

शेतकऱ्याच्या घरी धाडसी घरफोडी ; अडीच लाखांचा मुद्देमाल घेऊन चोर पसार

करमाळा समाचार

घरात सर्वजण झोपलेले असताना मुख्य दरवाज्याची खडी उचकटून आत प्रवेश करीत धाडसी चोरी झाल्याने टाकळी व परिसरात खळबळ उडाली आहे. २८ तारखेला रात्री टाकळी येथील प्रल्हाद दोंडमिसे यांचे कुटुंबीय झोपलेले असताना घरात अज्ञातांनी प्रवेश केला व घरातील तब्बल अडीच लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २८ तारखेच्या मध्यरात्री घडली आहे. याप्रकरणी अनोळखी चोरट्यांवर करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, टाकळी तालुका करमाळा येथे प्रल्हाद महादेव दोंडमिसे यांचे कुटुंबीय राहतात. शेती करून आपली उपजीविका चालवतात ते २८ जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास जेवणखाण करून घरात झोपले होते. यावेळी ते बेडरूम मध्ये असताना त्यांचे आई – वडील हे घरातील हॉलमध्ये झोपले होते. पहाटेच्या सुमारास आईला जाग आल्यानंतर आईने घरात पाहिले असता घरातील दुसऱ्या बेडरूम मधील सामान अस्ताव्यस्त पडले आहे. तसेच कपाटाचा दरवाजा तुटलेला आहे. यावेळी तिने सर्वांना जागे केले व घडलेला प्रकार सांगितला.

यावेळी पाहिले असता अडीच तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, अर्धा डोळे वजनाचे सोन्याची ठुशी, कानातील चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन वेल व पंधरा हजार रुपये रोख रक्कम असे एकूण अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी प्रसार केलेला दिसून आला. यानंतर याबाबत करमाळा पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास करमाळा पोलीस करीत आहेत.

ads
ads
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE