करमाळासोलापूर जिल्हा

रस्ते, अडविलेल्या पाईपलाईन या संबंधी प्रकरणांचा कमी वेळेत निपटारा ; तहसिलदार समीर माने यांचे आश्वासन ; तसेच आ. शिंदेंनेही केले शेतकऱ्यांना आवाहन

करमाळा समाचार

महसूल विभागाच्या महाराजस्व अभियानाचा लाभ जास्तीत शेतक-यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करताना रस्त्यासंबंधी वादाला राजकीय स्वरूप नसावे असे सांगितले. त्याबरोबरच विकासासाठी कोणत्याही स्वरूपाचे वाद हे हानिकारक असतात त्यामुळे रस्त्याचे वाद हे लोकसहभागातून आपापसातील सामंजस्याने सोडवावेत असे प्रतिपादन आमदार संजयमामा शिंदे यांनी केले.

ते उमरड ता.करमाळा येथे महसूल विभागाच्या वतीने आयोजित महाराजस्व अभियानांतर्गत ‘अतिक्रमित व बंद झालेले रस्ते मोकळे करणे’ यासंदर्भात प्रातिनिधिक स्वरूपात उमरड-पोंधवडी या रस्त्याचा उद्घाटन समारंभ प्रसंगी बोलत होते. या कामाचा शुभारंभ आमदार संजयमामा शिंदे यांचे हस्ते संपन्न झाला.

यावेळी उपविभागीय अधिकारी माढा विभाग कुर्डूवाडी ज्योती कदम, तहसीलदार समीर माने, माजी जिल्हापरिषद सदस्य वामनदादा बदे उपस्थित होते.

यावेळी बोलताना तहसीलदार समीर माने यांनी महसूल विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या महाराजस्व अभियानासंबंधी माहिती देवून जास्तीत जास्त लोकाना रस्ते, अडविलेल्या पाईपलाईन या संबंधी प्रकरणांचा निपटारा मोहिम स्वरूपात एका महिन्यात करणार असल्याचे सांगितले. तसेच वारस नोंदी बाबत ही ग्रामसभा घेवून 8 अ चे वाचून करून मयत खातेदारासंबंधी वारस नोंदी तात्काळ करण्याबाबत तलाठी व मंडळअधिकारी मोहिम राबविणार असल्याचे सांगितले.

आज तालुक्यामध्ये आठ महसूल मंडळात संबंधित मंडळ अधिकारी व तलाठी लोकसहभागातून बारा रस्ते अतिक्रमण मुक्त केले असल्याचे सांगितले. यावेळी निवासी नायब तहसीलदार विजयकुमार जाधव, महसूल नायब तहसीलदार सुभाष बदे, मंडळ अधिकारी संतोष गोसावी, तलाठी साईनाथ आडगटाळे, सतिष बिजले, अजय चव्हाण, आनंदा डोणे, विनोद जवणे, ग्रामसेवक सरडे कृषी सहायक गिरीश मुळे , बापु चोरमले, उदय ढेरे, विनोद जाधव , उपसरपंच संदिप बदे, माजी सरपंच प्रमोद बदे, पोलीस पाटील अंकुश कोठावळे,कोतवाल अनिल भोसले,रामभाऊ खरात,उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष गोसावी यांनी केले;तर आभार सुभाष बदे यांनी मानले.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE