मोबाईल टाळल्यास हमखास यशाची खात्री ; नुतन मंत्रालय कक्ष अधिकारी जुनेद काझी यांचा सन्मान
करमाळा समाचार
आपले शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले असले तरीही परीक्षा देत असताना मराठीतून द्यावी लागली. त्या माध्यमाला आपल्या यशात बाधा न करता प्रयत्न व जिद्द केल्याने आपल्याला यश संपादन झाले. सध्या मोबाईल आपला शत्रू झाला आहे. युवा पिढीने मोबाईल पासून लांब राहिल्यास त्यांना यश नक्कीच मिळेल अखेर तुमची जिद्द, चिकाटी व परिश्रम महत्त्वाचे आहे असे प्रतिपादन मंत्रालय कक्ष अधिकारी जुनेद नासिर काझी यांनी केले. सदरच्या काझी यांचे अडीच लाख विद्यार्थ्यात चारशे जागा असताना ३७ व्या क्रमांकाने परिक्षा उत्तीर्ण झाल्याने सन्मान करण्यात आला यावेळी ते बोलत होते.

मंगळवार दि ७ रोजी कंदर येथे ग्रामदैवत शहानूर साहेब (नाना) यांच्या दर्गासमोर मंत्रालय कक्ष अधिकारी जुनेद नासिर काझी यांचा सत्कार समारंभ पार पडला. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष हरिभाऊ तुकाराम मंगवडे हे होते. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक हे विजय प्रतापचे तालुका अध्यक्ष शिवशंकर माने यांनी केले. अनुमोदन सुभाष पवार यांनी दिले.
कार्यक्रमास उपस्थित कंदर गावचे सरपंच मौलासाहेब महंमद मुलाणी, माजी सरपंच आजिनाथ देवराव शिंदे, आजिनाथचे माजी व्हाईस चेअरमन नानासाहेब नवनाथ लोकरे, गोपाळ लक्ष्मण मंगवडे, आदिनाथचे माजी संचालक नवनाथ देवराव शिंदे, एडवोकेट नवनाथ शहाजी कदम, धर्मराज लोकरे, आदिनाथ चे संचालक विजयसिंह जिजाबा नवले व आदिनाथचे संचालक उद्योगपती दादासाहेब नामदेव पाटील, श्रीहरी शिंदे व रयत क्रांती संघटक राजकुमार सरडे व बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम पार पाडण्यासाठी शिवशंकर माने यांच्या मार्गदर्शनाखाली वैजनाथ तुकाराम भगत, लालासाहेब जहागीरदार व मुदस्सर जहागीरदार यांनी परिश्रम घेतले.

