करमाळाताज्या घडामोडीसोलापूर जिल्हासोलापूर शहर

करमाळा परिसरातील कमलाई एक्सप्रेस क्रूजर गाडीचा कारसोबत अपघात ; १ ठार ८ जखमी

करमाळा समाचार

भिगवणहुन करमाळाला येत असताना करमाळा परिसरातील कमलाई एक्सप्रेस असे लिहिलेल्या क्रूजर गाडीचा जिंती येथील चौफुला या ठिकाणी कारगाडी सोबत झालेल्या अपघातात एक ठार 8 जण जखमी झाले आहेत. काहींना भिगवण येथे तर काहींना करमाळा येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.

एम एच 13 बी एन 25 18 सदर क्रुझर ही भिगवण येथून करमाळ्याच्या दिशेने येत होती. तर एम एच 12 एन पी 97 32 ही कार गाडी करमाळ्यातून पुण्याच्या दिशेने निघालेली होती. जिंती येथील चौफुल्यावर गतिरोधक नसल्यामुळे सदरचा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

कार गाडीमध्ये वृद्ध दांपत्य तर क्रूजर गाडीमध्ये लग्नाच्या निमित्ताने गेलेले वराड होते अशी माहिती मिळत आहे. सदरचा अपघात हा दोन तासांपूर्वी साडेपाच च्या सुमारास घडला आहे. या ठिकाणी पाच रस्ते वेगवेगळ्या दिशेने जात असून सदरचा रस्ता हा वाहतुकीसाठी मोठ्या प्रमाणावर धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर गतिरोधक असावे अशी मागणी दिलीप दंगाणे यांनी केली आहे. करमाळा पोलिस घटनास्थळी पोहचले तर गावकऱ्यांनी जखमींना दवाखान्यात पोहचवण्यासाठी मदत केली.

DMCA.com Protection Status
error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE