सोलापूर उद्योगरत्न पुरस्काराचे आयोजनात ३५ उद्योजकांना पुरस्कार
केम –
रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी केम येथे युगंधर ग्रामीण सेवाभावी संस्था आयोजित सोलापूर उद्योगरत्न पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामीण भागात पहिल्यांदाच अशा उद्योजकांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता. युगंधरचे संस्थापक अध्यक्ष विजयसिंह ओहोळ यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
पुरस्कारासाठी सोलापूर जिल्यातील एकूण 35 उद्योजकांची निवड करण्यात आली होती. यामध्ये योगेश गजानन वासकर, बाळासाहेब देवकर, तानाजी चांदगुडे, डॉ राजेंद्र चव्हाण, सुरज तळेकर,राजेंद्र ढेकणे, वसंत वजाळे, सुरज गुरव, सोमनाथ खराडे, दिपक टेकाळे व इतर 25 उद्योजकांना पुरस्कार वितरण करण्यात आले.
यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष विशाल ओहोळ, अच्युत काका पाटील, महावीर तळेकर, सागर दोंड, महेश तळेकर, गोरख पारखे, महेंद्र ओहोळ, सत्यशील ओहोळ, सागराराज तळेकर, बापु नेते तळेकर इ सर्वांनी मोलाचे योगदान दिले.