करमाळासोलापूर जिल्हासोलापूर शहर

संजयमामा शिंदे गट इथच आहे पण दिसत नाही ; संजयमामांची पडद्याआडुन राजकीय खेळीने नवा ट्विस्ट

करमाळा समाचार

करमाळा नगर परिषदेची निवडणूक जाहीर झाली असून त्यामध्ये गटातटाच्या राजकारणासह पक्षीय राजकारणाचाही विचार केला जात आहे. नुकतंच रश्मी बागल, कन्हैयालाल देवी व गणेश चिवटे यांच्या दरम्यान एक बैठक झालेली दिसून आली. सदर बैठक युतीची जरी असली तरी त्यात भाजपा पदाधिकारी बैठक होती. यामुळे थेटपणे संजयमामा शिंदे सक्रिय दिसत नसले तरी त्यांचे समर्थक मैदानात उतरत असल्याने पडद्यामागून शिंदे सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे बागल व शिंदे यांची नगरपरिषदेसाठी जवळपास युती निश्चित तर मागच्या दाराने शिंदे यांची नगरपरिषदेत इंट्री असं चित्र दिसून येत आहे.

करमाळा नगर परिषदेत एका गटाच्या किंवा पक्षाच्या जीवावर सत्ता स्थापन करणे सध्यातरी अशक्य दिसून येत आहे. त्यामुळे वीस नगरसेवक व जनतेतून थेट नगराध्यक्ष निवडणूक विजयी व्हायचं असेल तर युती व आघाड्याशिवाय पर्याय नसल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे जगताप व सावंत यांच्या दरम्यान बोलणे सुरू आहेत. तर बागल व शिंदे समर्थक यामध्ये बोलणे झालेले दिसून येत आहेत. त्यातून येणाऱ्या काळात दुरंगी का तिरंगी लढत यावर लक्ष केंद्रित होणार आहे.

करमाळा शहरात माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या गटाची सत्ता मागील २५ ते ३० वर्षांपासून राहिलेली आहे. तर कायमच सावंत व देवी हेही नगरपरिषद मध्ये सदस्य किंवा सत्ताधारी असल्याचे दिसून येतात. त्यामुळे देवी यांची नागरिक संघटना सावंत गट यांच्यावरही निवडणुकीचा कल दिसून येणार आहे. सावंत सध्या वैयक्तिक नगराध्यक्ष पदाच्या रेसमध्ये असून ते जगतापांबरोबर जाऊन नगराध्यक्षच्या जागेवर तडजोड करतील का ? स्वतः मैदानात उतरतील याकडे लक्ष लागून राहिले आहे. दोन्हीही गट वेगळे लढल्यास यातून एक प्रकारे बागल चिवटे व देवी यांच्या आघाडीचा मार्ग सुकर होण्याची शक्यता असल्याने नेमका सावंत व जगताप कोणता निर्णय घेतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.

त्यातच मागील वेळी करमाळा शहर विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवलेले संजयमामा शिंदे यांना मात्र नगरपरिषदेत निवडणुकीत उघडपणे दिसून आलेले नाहीत व येण्याची शक्यता कमी असल्याचे दिसून येते. त्यांचे समर्थक असलेले गणेश चिवटे व कन्हैयालाल देवी हे सध्या बागल यांच्यासोबत बैठका घेत असून येणाऱ्या काळात बागल, देवी व चिवटे एकत्र लढण्यावर जवळपास निश्चित झाले आहे. त्यामुळे जरी शिंदे हे उघडपणे मैदानात येत नसले तरी चिवटे व देवी यांच्या माध्यमातून शिंदे ही पडद्यामागून आपली राजकीय डावपेच आखताना दिसून येतील.

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !
WP Radio
WP Radio
OFFLINE LIVE