पंचवीस शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित ; पंचायत समीती हॉल मध्ये कार्यक्रम
करमाळा – विशाल घोलप
करमाळा पंचायत समितीचे तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२२-२३ ची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. दि ३ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता पंचायत समिती येथील सभागृहात गटशिक्षणाधिकारी कादर शेख, तहसिलदार शिल्पा ठोकडे व गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील यांच्यासह प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर पुरस्कार वितरण केले जाणार आहे अशी माहिती गट विकास अधिकारी मनोज राऊत यांनी दिली आहे. यावेळी एक चषक देत सर्वांचा सन्मान केला जाणार आहे.

यामध्ये प्रभावती जगताप (जातेगाव), अंजली निमकर (श्रीदेवीचामाळ), विश्वनाथ निरवणे (राखवाडी), भागवत गर्जे (झरे), चंद्रहास चोरमले (वीट), शीतल कांबळे (सालसे), कीर्ती भापकर (वरकटणे), मीराबाई जाधवर (पाडळी), खालील खान (घारगाव), मनीषा गायकवाड(भिवरवाडी), मनीषा आदलिंगे (वांगी क्रमांक २), लक्ष्मण भंडारे (चांदणे वस्ती), रामदास काळे (फडतडे वस्ती), रमेश कोडलिंगे (सातोली), रवींद्रकुमार पवळ (सोगाव पश्चिम), राजू भोंग (देलवडी), महेश आरडे (घरतवाडी), हरिश्चंद्र कडू (श्रीदेवीचा माळ), नानासाहेब मोहिते (सोगाव पश्चिम), गंगू खताळ (वांगी क्रमांक एक), मन्नान मोमीन (हिसरे), सिताराम भिल (उमरड), महादेव यादव (देवळाली), हनुमंत ढेरे (गटसाधन केंद्र करमाळा), सुग्रीव नीळ (पंचायत समिती) करमाळा असे पुरस्कार प्राप्त शिक्षकांची नावे आहेत.
