बागल यांची पत्रकार परिषद – अनेक बाबींवर खुलासा व पुढील दिशा जाहीर
करमाळा समाचार
तालुक्याच्या राजकारणात पुन्हा एकदा सक्रिय होताना गावपातळीवरील समस्या व लोकांना येणाऱ्या अडचणी जाणून घेत आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून काम करताना योग्य वेळी योग्य निर्णय घेऊनच ठरवले जाईल. गाव पातळीवर बागल गटाचे वर्चस्व असून त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात आम्ही कमी पडलो. पण आता ती उणीव पूर्ण करणार आहोत. बागल गटाला प्रकाशझोतात येण्यास जास्त काळ लागणार नाही. त्यामुळे स्वबळावर ही बागल गट उभा राहू शकतो असे मत दिग्विजय बागल यांनी करमाळा येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले.

माजी माजी आमदार नारायण पाटील यांच्यासोबत युती करण्यावरून विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना बागल म्हणाले की, युती आघाड्या हा परिस्थिती पाहून घेण्यात येणार निर्णय आहे. युती करावीच असे विरोधक ही मोठे नसल्यामुळे बागल आणि पाटील एकत्र आले तरच पराभव होईल असेही नाही. त्यामुळे तीनही गट स्वतंत्र लागल्यास तालुक्यात बागल गट आपली ताकद दाखवून देईल.

सध्या तालुक्यात लोकांच्या तक्रारी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे. अनेक तक्रारी असून वीज, पाणी, तसेच लसी बाबतच्या तक्रारी ऐकायला मिळाल्या व त्याचा पाठपुरावा शासन दरबारी सुरू आहे.
विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्या कारखान्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या नावावर उचललेल्या कर्ज बागल यांनी कारखान्यासह बँकांनाही जबाबदार धरले. लोकांना अडचणी येण्यापूर्वी पैसे वापरले तर हरकत नाही पण ते करत असताना त्यांना विश्वासात घेतले पाहिजे . पण लोकांवर अडचणी येत असतील तर तात्काळ ते पैसे परत केले पाहिजेत असे मत यावेळी बागल यांनी मांडले. ज्यांच्यावर कर्जाचा डोंगर झाला आहे अशा शेतकरी शेतकऱ्यांनी येऊन बाजू मांडण्यासाठी विनंती केल्यास आपण नक्कीच त्याची बाजू शासनदरबारी मांडू असे यावेळी बागल म्हणाले.